602 मध्ये ऑफिस नको रे बाबा!; अजित पवारच अंधश्रेद्धेचे ‘बळी’, प्रकरण काय?
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोरील ही खोली अजित पवारांना मिळणार होती, मात्र त्यांनी नकार दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT

Ajit Pawar Latest News : ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’, हा तुकोबारायांचा अभंग राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवारांना अगदी हुबेहुब लागू होतोय. ‘महाराष्ट्र हे प्रगतशील विचारांचं, पुरोगामी राज्य आहे. देशाला, जगाला आदर्श ठरतील अशा कितीतरी सामाजिक सुधारणांची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे’, असं सांगणारे अजित पवार विचाराला साजेशी कृती करायला कचरतात, हेच समोर आलंय. मंत्रालयातील 602 क्रमांकाचे कार्यालया मिळताच अजित पवारांनी ते कार्यालय नाकारलं, याचं कारण म्हणजे अंधश्रद्धा. 602 क्रमांकाचे कार्यालय का नाकारलं? हा प्रकार नेमका काय आणि 602 चा इतिहास काय? हेच समजून घेऊयात…
अंधश्रद्धा आणि राजकारणी यांच्या कथा तुम्हीही कधीतरी ऐकल्या असतील. कधी मंत्र्यांना मिळणाऱ्या बंगल्याच्या, तर कधी कार्यालयाच्या… अजित पवार यांच्याशी संबंधित असाच एक नवीन किस्सा समोर आला आहे. उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारांनी मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर असलेलं कार्यालय घेण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे. या गोष्टीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वाचा >> Politics: भारतातील राजकीय नेत्यांच्या ‘रिटायरमेंट’चा इतिहास नेमका आहे तरी काय?
तुम्हालाही वाचायला हे वेगळं वाटत असेल, पण अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाच्या खोलीत कार्यालय बनवायचे नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. वृत्तानुसार, त्यांनी सहाव्या मजल्यावरील दुसर्या एका खास खोलीत आपले कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
सहावा मजला, खोली क्रमांक 602
602 क्रमांकाची खोली अगदी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोरच आहे. ही खोली 3000 स्क्वेअर फूट इतकी आहे आणि आणि केबिनही खूप मोठी आहे. यात एक मोठी कॉन्फरन्स रूमही आहे आणि ऑफिस केबिनसाठीही पुरेशी जागा आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय मंत्रालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आहे, त्यामुळे हा मजला सत्ता केंद्र मानला जातो.