Maharashtra Breaking News : "अमेरिकेत जाऊन घटनेचा...", नारायण राणेंचा राहुल गांधींवर निशाणा

मुंबई तक

15 Sep 2024 (अपडेटेड: 15 Sep 2024, 09:05 AM)

Narayan Rane Latest News : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.

Narayan Rane

Maharashtra Breaking News

follow google news
  • 09:16 AM • 15 Sep 2024
    Narayan Rane : छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी आले नाहीत, पण पुतळा पडल्यावर...

    सध्या सिंधुदुर्गातील स्मारकाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पुतळा पडला हे पाहण्यासाठी काहीजण मालवणात आले. आता स्मारक तयार करायला राज्यकर्त्यांना भिती वाटते. बॅ.नाथ पै यांची बरोबरी कोणाशी होवू शकत नाही. बॅरिस्टर झालेला माणूस आंदोलन करतो; विचार करा,केवढे योगदान असेल.लोकांमध्ये जागृती आणून समृद्धी कडे नेण्याचे काम बॅ.नाथ पै यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मालवणात होते. कितीजण आले नतमस्तक होण्यासाठी? पण जे नतमस्तक होण्यासाठी आले नाहीत. ते पुतळा पडल्यावर पाहण्यासाठी आले. अशी टीका राणेंनी विरोधकांवर केली. पंतप्रधान नेहरू बॅ.नाथ पै यांना चहा नाष्टा करायला आपल्या घरी बोलवायचे. नेहरू हे बॅ.नाथ पै कडून विचार घ्यायचे. त्यामुळे आपले बॅ.नाथ पै किती विद्वान होते, याची प्रचिती येते. ते वेंगुर्ल्यातील होते, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे,असे नारायण राणे म्हणाले 

  • 09:09 AM • 15 Sep 2024
    वेंगुर्ल्याच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणेंची तोफ धडाडली, नेमकं काय म्हणाले?

    Narayan Rane Latest Speech : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. राणे म्हणाले,बॅ.नाथ पै यांनी आपल्या जीवनात ज्या ज्या क्षेत्रात प्रवेश केला त्याला नावलौकिक मिळवून दिला.चालना मिळविण्यासाठी संसदेचा योग्य उपयोग केला.देश आणी समाजासाठी वाहून जाणे, असे त्यांचे गुण होते. अशी माणस आज समाजात किती आहेत? बॅ.नाथ पै यांचे कौतुक हे त्यांचा अभिमान नाही तर, तो कोकण आणी महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे मिळविण्यासाठी बॅ.नाथ यांना किती कष्ट घ्यावे लागले असतील?त्यांचा नावलौकिक कोणीच मिळवू शकत नाही. आज आपल्या देशातील नेते अमेरिकेत जातात आणी आपल्याच भारतीय घटनेचा अपमान करतात. अशा शब्दांत नारायण राणे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा समाचार घेतला. राणे वेंगुर्ल्याच्या कार्यक्रमात बोलत होते.
     

follow whatsapp