Maharashtra Breaking News : शिंदेंच्या आमदाराची 'सिडको'च्या अध्यक्षपदी वर्णी

मुंबई तक

16 Sep 2024 (अपडेटेड: 16 Sep 2024, 07:04 PM)

Ajit Pawar Latest News : राज्यात ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना जी काही मदत करायची असेल, ती सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. सर्व ठिकाणी ओला दुष्काळ नाही.

 Sanjay Shirsat, Sanjay Shirsat News, cidco president

सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची नियुक्ती

follow google news
  • 07:04 PM • 16 Sep 2024
    सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची नियुक्ती

     मंत्रिमंडळात स्थानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तशा प्रकारचा शासन आदेशही जाहीर करण्यात आला आहे. 

     

  • 10:17 AM • 16 Sep 2024
    शरद पवारांच्या 'त्या' प्रश्नावर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

    शरद पवार म्हणतात दीड हजार रुपये देऊन काही होत नाही, महिलांची अब्रू वाचवणं गरजेचं आहे, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कुणाचंही सरकार असेल, त्या प्रत्येकालाच वाटतं की कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली पाहिजे. शंभर टक्के अब्रू वाचली पाहिजे. तशा पद्धतीचा प्रयत्न हा प्रत्येक सरकार करत असतं. आम्हीपण करत आहोत. पण लाडकी बहीण योजना ग्रामिण भागात खूपच लोकप्रीय झाली आहे. तसच महिलांचं सरक्षणही महत्त्वाचं आहे. 

  • 09:40 AM • 16 Sep 2024
    अजित पवारांनी सिद्धीविनायक मंदिरात घेतलं बाप्पाचं दर्शन, काय साकडं घातलं?

    Ajit Pawar Latest News : बाप्पासाठी प्रत्येकाची श्रद्धा असते. त्या श्रद्धेपायी आपण नतमस्तक होऊन दर्शन घेत असतो. सर्वांचं भलं व्हावं, हीच प्रत्येकाची भावना असते. राज्यात ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना जी काही मदत करायची असेल, ती सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. सर्व ठिकाणी ओला दुष्काळ नाही. काही भागात पाऊस चांगला झाला. काही भागात जास्त पाऊस झाल्याने पीकांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी मिळालं. त्यामुळे पीकं खराब झाली. काही ठिकाणी नदींना पूर आले, त्यामुळे नदीजवळ असलेल्या जमिनी खरडून गेल्या.
     

follow whatsapp