डिश अँटीना सरळ करताना तोल गेला अन् गच्चीवरून पडून…,14 वर्षीय मुलगा जीवाला मुकला

प्रशांत गोमाणे

06 Aug 2023 (अपडेटेड: 06 Aug 2023, 09:39 AM)

नालासोपारामधून (Nallasopara) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 14 वर्षीय मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत मुलगा हा डिश अँटेना सरळ करण्यासाठी गच्चीवर गेला होता. या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो जमीनीवर कोसळला होता.

14-year-old boy dies after falling from 8 storey building while straightening dish antenna nallasopara crime story

14-year-old boy dies after falling from 8 storey building while straightening dish antenna nallasopara crime story

follow google news

नालासोपारामधून (Nallasopara) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 14 वर्षीय मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत मुलगा हा डिश अँटेना सरळ करण्यासाठी गच्चीवर गेला होता. या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो जमीनीवर कोसळला होता. यावेळी तत्काळ त्याला महापालिका रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. आदर्श मिश्रा असे या मृत मुलाचे नाव आहे, तो इयत्ता नववीत शिकत होता. आदर्शच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे, तसेच परिसरात देखील हळहळ व्यक्त होत आहे. (14-year-old boy dies after falling from 8 storey building while straightening dish antenna nallasopara crime story)

हे वाचलं का?

नालासोपारा (Nallasopara) पुर्वेच्या मोरेगाव येथील शिवम कॉम्प्लेक्समधील साई सृष्टी हाइट्स ही 8 मजली इमारत आहे. या इमारतीच्या पाचव्य मजल्यावर मिश्रा कुटुंब राहतं. दरम्यान मिश्रा काही सदस्य युपीला आपल्या गावी गेले होते.त्यामुळे घरी मुलगा आदर्श मिश्रा आणि आरती मिश्रा हे दोघे एकटेच होते. दोघे भाऊ-बहिण मिळून दुपारी टीव्ही पाहत होते. या दरम्यान टीव्हीवरील चित्र स्पष्ट दिसत नसल्याने आदर्श इमारतीच्या गच्चीवर चढला होता. टीव्हीचा अँटेना फिरवून टीव्ही वरील चित्र स्पष्ट दिसेल, असा त्याचा हेतू होता. मात्र डिश अँटेना फिरवताना त्याला तोल गेला आणि 8 मजली इमारतीवरून खा्ली कोसळून त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : Mumbai crime : ‘वाढदिवसाला भेट, प्रेम अन् बलात्कार’, मॉडेलने दाखवले व्हिडीओ

गच्चीवरून मुलगा पडल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी लगेचच त्याला नजिकच्या वसई-विरार महापालिकेतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी आदर्श मिश्राला मृत घोषित केले होते. या घटनेने मिश्रा कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आदर्श हा इयत्ता नववीत शिकत होता. सेंट अँथोनी स्कुलचा तो विद्यार्थी होता. या घटनेने आता परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : ‘मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार’; धमकी देणाऱ्याला अटक, नावंही आलं समोर

दरम्यान अशा घटना याआधी देखील घडल्या आहेत. या प्रकरणात कुटुंबियांनी मुलांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना घडतात. जर या घटनेत मिश्रा कुटुंबातील एखादी मोठी व्यक्ती घरी असती आणि त्यांनी आदर्शला गच्चीवर जाण्यास रोखले असते, तर कदाचित ही घटना घडलीन नसती आणि आदर्श मिश्रा सुखरूप असता. त्यामुळे कुटुंबियांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष देणे ही सध्याची गरज आहे, आणि जर मुलांकडे दुर्लक्ष केल्यास अशा घटना घडतात.

    follow whatsapp