कल्याण: ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये (Kalyan) एका 15 वर्षीय मुलाचा सर्पदंशाने (Snakebite) मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत मुलाचं नाव अमित असं आहे. सर्पदंश झाल्यानंतर अमित तात्काळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, इथे सर्पदंशविरोधी लस उपलब्ध नसल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. (15 year old boy died of snakebite in kalyan it is alleged that child died due to non availability of anti snake bite vaccine)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
कल्याण पूर्वमधील सुदर्शन कॉलनी येथे राहणारा अमित हा नेहमीप्रमाणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले फळभाजीच्या गोणीवर बसला होता. त्या गोणीच्या आड असलेल्या विषारी सापाने अचानक अमितला चावा घेतला. अमितला उपचारासाठी तात्काळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं. पण याठिकाणी लस उपलब्ध नसल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला.
हे ही वाचा >> ‘नायक नहीं खलनायक हूं…’ गाणं म्हणत दिराने वहिनीला संपवलं, कारण अनैतिक…
त्यामुळेच पुढील उपचारासाठी अमितला ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. पण त्याचा उपचरदारम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमितच्या मृत्यूने परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका रुख्मिणीबाई रुग्णालयात नातेवाईकांसह शेजाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ पुरूषोत्तम टिके यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी नातेवाईकांनी अमितच्या मृत्यूस जबाबदार डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा >> बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस
कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय विभागाने मयत मुलाच्या नातेवाईकांच्या आरोपांचे खंडन केले आहे. रुग्णाला वेळेत उपचार मिळाले सर्प दंशाची लस देण्यात आली होती. रुग्णालयात ICU सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णाला कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते. असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमुळे अमितच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT