Girl looking for Husband Sign Board : आयुष्यात प्रत्येकालाच एका लाईफ पार्टनरची आवश्यकता असते. पण हा लाईफ पार्टनर मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. काही जण याला अपवादही असतील. या सर्व प्रकियेत पहिला मैत्री करावी लागते, नंतर लाईफ पार्टनर म्हणून योग्य आहे का? हे देखील तपासावे लागते.अशा दोन व्यक्तींना एकत्रित आणण्यासाठी टिंडरसारखे अॅप देखील अस्तित्वात आहेत. मात्र तरी देखील एका तरूणीने नवरा शोधण्यासाठी थेट रस्त्यावर उतरून पोस्टर्स झळकवले आहेत. या पोस्टर्सची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (a girl looking for a husband sign board in street newyork city story)
ADVERTISEMENT
द पोस्टने दिलेल्या माहितीनूसार, 29 वर्षीय कॅरोलिना गीट्स एक ब्युटी इन्फ्लुएन्सर आहे. कॅरोलीना स्वत:साठी एक नवरा शोधायला सुरूवात केली आहे. यासाठी तिने टिंडर सारख्या अॅपच्या माध्यमातून लाईफ पार्टनर शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तिला तिच्या आवडीचा नवरा मिळालाच नाही. त्यामुळे आता ती कार्डबोर्ड आणि बिलबोर्ड घेऊन थेट रस्त्यावर उतरली आहे. या कार्डबोर्डवर ‘नवरा शोधतेय’ असा मजकूर लिहत रस्त्यावर झळकावायला सूरूवात केली आहे.
हे ही वाचा : Bademiya: हे काय… मुंबईतील प्रसिद्ध ‘बडेमिया’च्या किचनमध्ये उंदीर-झुरळं, FDA ही अवाक्
तरूणीचं म्हणणं काय?
मला असे वाटते की, जर एखाद्या गोष्टीचे मी संकेत देत असेन, तर देव ते ऐकूण माझ्याकडे पाठवतो, असे कॅरोलिनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशाप्रकारे पोस्टर्स झळकवून ती लाईफ पार्टनरच्या शोधात निघाली आहे. या दरम्यान कॅरोलिनाचा पोस्टर्स झळकावतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या फोटोला 80 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहे.
दरम्यान अशाप्रकारे रस्त्यावर उतरून पोस्टर्स झळकावल्याचा तिला काय फायदा झाला, असा सवाल तिला विचारण्यात आला. यावर कॅरोलिना म्हणते, मी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी एकाकडून फोन नंबर घेतला आहे. आम्ही अनेक दिवसांपासून एकमेकांशी बातचीत करत आहेत. विशेष म्हणजे पोस्टर्स झळकावल्याच्या साधारण 30 मिनिटानंतर तिच्याजवळ पहिला व्यक्ती आला होता. कॅरोलिनाने या व्यक्तीचे नाव उघड केले नाही. मात्र आम्ही एकमेकांना सध्या ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आता पाहूयात दोघांमधील बातचीत कुठपर्यंत पोहोचते.
हे ही वाचा : Viral News : बापरे! व्हिटॅमिनची गोळी समजून गिळली भलतीच गोष्ट, अन्…
5 हजार डॉलरच बक्षीस
दरम्यान याआधी लॉस एंजेलसमध्ये 35 वर्षीय वकिल ईव टीला कॉल्सनने नवऱ्याचा शोध घेणाऱ्यास 5 हजार डॉलरच बक्षीस देण्याची घोषणा केली होती. द पोस्टशी बोलताना कॉल्सन म्हणाली की, डेटिंग अॅपवर असणारे पुरूष लग्नावरून गंभीर नसतात. त्यामुळे मला असे वाटते की एका पतीचा शोध घेण्यासाठी 5 हजार डॉलर देणे फायद्याचे आहे. जो माझ्या गरजा पुर्ण करेल आणि नात्यासाठी तयार असेल. तसेच माझ्याकडे वेळ घालवायला पैसै नाहीत असे देखील कॉल्सन म्हणाली आहे.त्यामुळे आता कॉल्सनला लाईफ पार्टनर मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.ही घटना न्युयॉर्क सिटीत घडली आहे.
ADVERTISEMENT