Ambarnath Crime: अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक गजाआड! 'असा' झाला पर्दाफाश

मुंबई तक

• 05:38 PM • 08 Dec 2024

Ambarnath Crime Latest News Update:  अंबरनाथ पश्चिम येथील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे.

 West Bengal rape case

West Bengal rape case

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंबरनाथच्या एका शाळेत घडली संतापजनक घटना

point

विद्यार्थींनीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या

point

त्या शाळेत नेमकं काय घडलं?

Ambarnath Crime Latest News Update:  अंबरनाथ पश्चिम येथील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन विद्यार्थीनींसोबत लैंगिक चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिम येथील एका शाळेत गरिब विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत एका शिक्षकाने लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षक विद्यार्थींनींचा व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरल्याने ते शाळेत येत नव्हते. याप्रकरणी एका एनजीओने दखल घेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर आली.

हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! 'या' दिवशी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2100?

या शाळेतील तीन अल्पवयीन मुलींवर शिक्षकाने लैंगिक चाळे केले होते. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या.वरिष्ठ पोलीस निरिक्षक बालाजी पांढरे प्रतिक्रिया देत म्हणाले, एक शिक्षक काही विद्यार्थ्यांकडून मसाज करवून घेत अश्लील चाळे करत असल्याची माहिती आम्हाला एका एनजीओकडून मिळाली होती. त्यानंतर आरोपी शिक्षकाला तातडीनं अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

हे ही वाचा >>India Alliance : उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व द्यावं, बड्या नेत्याचा राहुल गांधींवर अविश्वास?

    follow whatsapp