Andhra Pradesh Viral Video : निवडणूक जिंकण्यासाठी राजकारणी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. आतापर्यंत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसा, दारू आणि साड्या वाटल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या राज्यात प्रचाराची विचित्र पद्धतच समोर आली आहे.राजकीय पक्षांनी (Political Party) थेट त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेले कंडोमची पाकिटेच (Condom Packet) घरोघरी वाटली आहेत. या संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेने मतदार देखील चकित झाले आहेत. (andhra pradesh viral video party name and symbol on condome packet political campaign)
आंध्रप्रदेश राज्यात ही घटना घडली आहे. आंध्रप्रदेश राज्यातील दोन प्रमुख पक्षांनी कंडोमच्या पाकिटांवर त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह छापून ते घरोघरी वाटले आहेत. या संबंधित व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पवारांचा डाव.. दादांची कोंडी, कोण आहेत युगेंद्र पवार?
व्हायरल व्हिडिओत सत्ताधारी वायएसआरसीपी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष टिडीपी या दोन्ही पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह असलेली कंडोमची पाकिटे वाटताना कार्यकर्ते दिसत आहेत. मतदारांना घरोघरी जाऊन ही पाकिटे वाटली जात आहेत.
दरम्यान व्हिडिओत एक व्यक्ती दिसतो आहे. जो सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याबद्दल बोलताना दिसतोय. इतकच नाही तर कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत आणि पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेले कंडोमच्या पाकिटांचे वाटप करत आहे.
हे ही वाचा : 'बाया धरणारा तू...', अजय बारसकरांबद्दल जरांगेंचे गौप्यस्फोट
कंडोम वाटपावरून आरोप-प्रत्यारोप
दरम्यान या कंडोम वाटपावरून दोन्ही पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपही सूरू झाला आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाने टिडीपीला ट्विट करून घेरले आहे. 'पक्ष आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहे. निवडणूक प्रचाराचा हा प्रकार कंडोम वाटपावर थांबणार की पुढे जाऊन जनतेला व्हायग्राचे वाटप होणार आहे? असा सवाल देखील विचारला आहे. यानंतर टिडीपीने वायएसआरसीपीच्या लोगोसह कंडोमचे पॅकेट पोस्ट केले आहेत आणि ही तीच तयारी सूरू आहे का? ज्याच्याबद्दल पक्ष बोलत आहे, असा पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT