'या' मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघातात, ASI चा मृत्यू तर 9 जण जखमी

मुंबई तक

• 10:53 PM • 11 Dec 2024

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याला झालेल्या भीषण अपघातात एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

'या' मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघातात,

'या' मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघातात,

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याचा अपघात

point

अपघातात एका ASI चा दुर्दैवी मृृत्यू

point

कार अपघातामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 9 जण जखमी

जयपूर: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याचा आज (11 डिसेंबर) भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी जयपूरमध्ये झालेल्या या अपघातात ताफ्यात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 9 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय पात्र चौकात हा अपघात झाला. येथे चुकीच्या दिशेने येणाऱ्या एर्टिगा कारने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला धडक दिली. यावेळी चौकात तैनात एएसआय सुरेंद्र सिंह यांनी टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण एर्टिगा कार चालकाने सुरेंद्र सिंह यांनाच धडक दिली. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

पवन कुमार असे एर्टिगा चालकाचे नाव आहे. तो आखाती देशात ड्रायव्हर म्हणून काम करत होता. दरम्यान, या अपघातात तोही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा>> CM फडणवीसांची दिल्लीत जाऊन खलबतं, शिंदे-अजितदादांच्या 'त्या' खात्यांवरही भाजपचा डोळा!

नेमका अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, सीएम भजनलाल यांनी वाहतूक पोलिसांना त्यांच्या ताफ्याच्या हालचालीदरम्यान सामान्य लोकांना थांबवू नये अशा सूचना दिल्या होत्या. अशा स्थितीत मुख्यमंत्री निघाले असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या ताफ्यात घुसून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहनाला धडक दिली. यामध्ये 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 9 जण जखमी झाले आहेत. यातील दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. त्यापैकी  एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी स्वत: जखमींना रुग्णालयात नेऊन उपचारासाठी दाखल केले.

हे ही वाचा>> Mangesh Chivate: फडणवीस CM होताच शिंदेंना मोठा झटका! अत्यंत जवळच्या सहकाऱ्याला हटवलं

मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, एनआरआय सर्कलजवळ हा अपघात झाला, जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एक गाडी कारला धडकू नये म्हणून रस्ता दुभाजकाला जाऊन धडकलं. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि जखमींना रुग्णालयात नेले.

ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांचा ताफा नेहमीप्रमाणे पुढे जात होता आणि तेथे कोणतीही वाहतूक थांबलेली नव्हती. त्याचवेळी हा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली आणि रुग्णवाहिका येण्याची वाट पाहण्याऐवजी त्यांनी गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी नेले.'

    follow whatsapp