Best Yoga For Belly Fat : आज 21 जून. हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योग करण्याचे असंख्य फायदे आहेत. जर तुम्ही नियमितपणे योगा करत असाल तर तुम्हाला त्याचा अनेक प्रकारे फायदा होतो. सांगायचं झालं म्हणजे जर तुमचा लठ्ठपणा वाढत असेल आणि तुम्ही स्लीम व फीट राहण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर योग करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
ADVERTISEMENT
योगाच्या त्रिकोनासन, सर्वांगासन आणि वीरभद्रासनाचा सराव केल्याने तुमच्या पोटावरील चरबी तर कमी होईलच, पण कंबरेभोवती जमा झालेली चरबीही कमी होईल.
हेही वाचा >> बंड यशस्वी झालं नसतं तर शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते: दीपक केसरकर
त्रिकोनासन
जर तुमच्या पोटावर चरबी वाढली असेल तर त्रिकोनासन तुमच्यासाठी खूप चांगले आहे. योगाचे हे आसन केवळ पचनक्रिया सुधारत नाही, तर पोट आणि कंबरेवर साठलेली चरबी कमी करण्यासही ते उपयुक्त आहे. या आसनामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो आणि तो सुधारतो. हे आसन केल्याने तुमचे संतुलन आणि एकाग्रताही सुधारते.
हेही वाचा >> पुणे : पत्नीसह दोन मुलांना संपवलं अन् डॉक्टरने केली आत्महत्या, कारण…
सर्वांगासन
सर्वांगासन देखील वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते तसेच शरीराला शक्ती मिळते. यासोबतच ते मेटाबॉलिज्म वाढवते. यासोबतच थायरॉईडची पातळी संतुलित ठेवते. या आसनामुळे पोटाचे स्नायू आणि पाय मजबूत होतात. तसेच श्वसन प्रणाली सुधारते.
विरभद्रासन
तुम्हाला तुमच्या मांड्या आणि खांदे टोन करायचे असल्यास विरभद्रासन उपयुक्त ठरू शकते. विरभद्रासन तुमची पाठ, पाय आणि हातांना टोन करते तसेच तुमचे संतुलन सुधारते. हे तुमच्या पोटाला टोनिंग करण्यास देखील मदत करते.
ADVERTISEMENT