भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ‘वर्धमान’ नावाची इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात ढिगाऱ्याखाली जवळपास 45 ते 50 जण अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवासी आणि गोडावून असे एकत्रितपणे या इमारतीचे बांधकाम होते. यातील तळमजल्यावरील भागात गोडावून होते, तर वरील 2 मजले रहिवासी होते. इथे 8 ते 10 कुटुंब वास्तव्यास होते. तळमजल्यातील गोडावूनमध्ये 35 कामगार काम करत होते. घटनास्थळी एनडीआरफ आणि फायर ब्रिगेडचे जवान पोहचले असून बचावकार्य सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Building Collapsed in Bhiwandi, Maharashtra. 45 to 50 people trapped)
भिवंडीमध्ये इमारत कोसळली; अनेक जण अडकले असल्याचा अंदाज
विक्रांत चौहान
29 Apr 2023 (अपडेटेड: 29 Apr 2023, 10:38 AM)
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ‘वर्धमान’ नावाची इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Building Collapsed in Bhiwandi, Maharashtra. many people trapped