‘तिला’ भेटायला आला अन् गेम झाला; कुलरमध्ये…, नेमकं काय घडलं? बघा VIDEO

भागवत हिरेकर

05 Nov 2023 (अपडेटेड: 05 Nov 2023, 12:01 PM)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर प्रेयसीच्या कुटुंबीयांना ओळखत असल्याचे समोर आले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला राजस्थानी भाषेत म्हणताना ऐकू येते की, या व्यक्तीची पत्नी म्हणजेच भेटायला आलेल्या प्रियकराचा शोध घेत आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

एकमेकांवर जीव जडला की भेटीची ओढ लागतेच. पण, जगजाहीरपणे भेटता येत नाही, मग सुरू होत गुपचूप भेटी. पण, कधीतरी अशी वेळ येतेच की चोरी पकडलीच जाते. अशीच काहीशी घटना समोर आलीये. राजस्थानमधील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ खूपच आश्चर्यचकित करणारा आहे. एक व्यक्ती त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री आला होता अन् तेव्हाच तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडले.

हे वाचलं का?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती कुलरच्या आत लपून बसली होती. व्हायरल झालेला व्हिडिओ किती जुना आहे आणि तो राजस्थानमधील कोणत्या शहरातील आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचा >> एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका, नेमकं काय झालं?

प्रेयसीला भेटायला आला अन्…

रात्री प्रियकर प्रेयसीला भेटायला गेला असता घरच्यांना त्याचा आवाज आला. घरातील सदस्यांना वाटले की चोर आला आहे. त्यानंतर त्यांनी घराची झडती सुरू केली. तो माणूस घरात शिरल्यानंतर रस्त्यावरील कुत्रे भुंकायला लागले, त्यामुळे सर्वजण जागे झाले. यानंतर ते शोधण्यासाठी गेले असता त्यांना मुलीने काहीतरी लपवल्याचा संशय आला. तिने कुलरमध्ये काहीतरी लपवले असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी कुलर फिरवून पाहिलं तेव्हा त्यात प्रियकर लपून बसलेला होता.

Video : पिटबुल तोडत होता लचके अन् कुटुंब पाहत राहिलं, भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर प्रेयसीच्या कुटुंबीयांना ओळखत असल्याचे समोर आले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला राजस्थानी भाषेत म्हणताना ऐकू येते की, या व्यक्तीची पत्नी म्हणजेच भेटायला आलेल्या प्रियकराचा शोध घेत आहे. यावरून तो विवाहित असल्याचे समोर आले आहे.

कुटुंबीयांनी घातल्या शिव्या

त्याचवेळी कुटुंबातील महिला त्या दोघांना शिव्या देऊ लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, पकडला गेला. दुसरा यूजर म्हणाला की, ‘टेक्निकच चुकीची आहे. इतक्या थंडीत कूलरमध्ये कोण लपतं?’

    follow whatsapp