ISRO : इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारताचं महत्त्वकांक्षी ध्येय आणखीन जवळ पोहोचत पूर्ण होण्याच्या दिशेवर आहे. आता चांद्रयान किमान 150 किमी बाय कमाल 177 किमी कक्षेत फिरणार आहे. इस्रोने 14 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादोन ते बाराच्या सुमारास चांद्रयान-3 चे थ्रस्टर्स चालू केले होते. तसंच इंजिन जवलपास 18 मिनिटे चालू होते.
ADVERTISEMENT
चांद्रयान-3 चा चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश!
5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर त्याची कक्षा दोनदा बदलण्यात आली आहे. या दिवशी चांद्रयानाने चंद्राचे पहिले फोटो जारी केले. त्यावेळी चांद्रयान चंद्राभोवती 164 बाय 18074 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत होते. जे 6 ऑगस्ट 2023 रोजी 170 बाय 4313 किमी कक्षेत कमी करण्यात आले म्हणजेच ते चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचले.
यानंतर ९ ऑगस्टला तिसर्यांदा कक्षा बदलण्यात आली. त्यानंतर ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 174 किमी बाय 1437 किमीच्या कक्षेत फिरत होते. इस्रो चांद्रयान-3 चे इंजिन चंद्राच्या कक्षेत रेट्रोफिट करत आहे. यानंतर, पाचवा कक्ष 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8:38 ते 8:39 दरम्यान बदलला जाईल. याचाच अर्थ त्याचे इंजिन फक्त एका मिनिटासाठी चालू राहतील.
17 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी बाय 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील. लँडर मॉड्यूल 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4.45 ते 4.00 या दरम्यान डि-ऑर्बिटिंग करेल. यामुळेच त्याच्या कक्षेची उंची कमी होईल.
20 ऑगस्ट रोजी, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल पहाटे 2.45 वाजता डी-ऑर्बिटिंग करेल. 23 ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक झाले तर लँडर साडेसहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
चांद्रयान-3 वर ISTRAC कडून सतत देखरेख!
चांद्रयान-3 चे बंगळुरूमधील इस्रोच्या सेंटर टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) च्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) मधून सतत निरीक्षण केले जात आहे. सध्या चांद्रयान-३ ची सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत.
ADVERTISEMENT