Election commissioner Arun Goyal resign : आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याहीक्षणी लागण्याची शक्यता आहे. पण या लोकसभा निवडणुकीआधीच केंद्रीय निवडणूक आयुक्त (Election commissioner) अरुण गोयल (Arun Goyal) यांनी राजीनामा दिला आहे. गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, मात्र त्या आधीच त्यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. (election commissioner arun goyal resign before lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगात यापूर्वीच निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले होते. त्यात आता लोकसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर ठेपली असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उरले आहेत. भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त आहेत. त्यामुळे आता निवडणूक यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आहे.
हे ही वाचा : Lok sabha : उद्धव ठाकरेंनी जाहीर केला मुंबईतला पहिला उमेदवार!
दरम्यान अरुण गोयल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत निवडणूकीच्या तयारीसाठी अनेक राज्यांचा दौरा केला होता. गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, मात्र आता त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे की, 'राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे, जो 09 मार्च 2024 पासून प्रभावी मानला जाईल.'
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाचा कार्यकाळ) अधिनियम, 2023 च्या कलम 11 च्या कलम (1) नुसार, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त कधीही राष्ट्रपतींना लेखी राजीनामा देऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
हे ही वाचा : "मला मोदींना भारतरत्न द्यायचा, कारण...", राऊतांचं घणाघाती भाषण
रम्यान भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेण्यापूर्वी अरुण गोयल हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयात सचिव होते. त्यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
ADVERTISEMENT