Viral News : बॉसकडून दहा दिवसांची सुट्टी 2 मिनिटात मंजूर, पुढच्या क्षणी मेसेज डिलीट; फोटो व्हायरल

प्रशांत गोमाणे

• 03:08 PM • 16 Sep 2023

एका कर्मचाऱ्याचा व्हाट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाला आहे. या चॅटमध्ये तब्बल 10 दिवस कर्मचाऱ्याला सुट्टी मिळाली आहे. ही सुट्टी मिळताच कर्मचाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या व्हाट्सअ‍ॅप चॅटवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

employee whatsapp chat screenshot viral after manager approved 10 day leave

employee whatsapp chat screenshot viral after manager approved 10 day leave

follow google news

Manager Employee WhatsApp Chat Screenshot Viral : महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची उत्सुकता अनेकांना लागली आहे. या गणपती सणासाठी सुट्टी मिळावी यासाठी अनेक कॉर्पोरेट कर्मचारी आप-आपल्या बॉस अथवा मॅनेजरकडे सुट्टयांचा अर्ज करत आहेत. असे असतानाच एका कर्मचाऱ्याचा व्हाट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाला आहे. या चॅटमध्ये तब्बल 10 दिवस कर्मचाऱ्याला सुट्टी मिळाली आहे. ही सुट्टी मिळताच कर्मचाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या व्हाट्सअ‍ॅप चॅटवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. (employee whatsapp chat screenshot viral after manager approved 10 day leave)

हे वाचलं का?

कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना क्वचितच सुट्टया मिळतात. सुट्टया मिळाव्या यासाठी त्यांना एक वेगळा संघर्ष करावा लागतो. तेव्हा जाऊन त्यांना सुट्टया मिळत असतात. अशात एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रिनश़ॉट व्हायरल होत आहे. या स्क्रिनशॉटमध्ये एक कर्मचारी त्याच्या बॉसजवळ व्हाट्सअ‍ॅप वरून सुट्ट्या मागतोय.

हे ही वाचा : Asia Cup Viral Video : हातात ड्रिंक्स आणि कांगारू उड्या, विराट असा धावला की…

या सुट्टया मागताना कर्मचारी लिहतो की, पुजा मी या महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास एक ट्रिप प्लान करत आहे. त्यामुळे मला 15 ते 25 तारखेपर्यंत सुट्टी मिळू शकेल का? असे कर्मचारी बॉसला विचारतो. यावर बॉस पुजा त्यांच्या सुट्टयांना मंजूरी देत मजा कर असा सल्लाही देते. यानंतर बॉस दोन मेसेज टाईल करून सेंड करते आणि पुन्हा डिलीट करते.

विशेष बाब म्हणजे, या कर्मचाऱ्याला 2 मिनिटातच सुट्टी मिळते, असे क्वचितच घडतं की दोन मिनिटात एखाद्या कर्मचाऱ्याला सुट्टी मिळते. त्यामुळे या स्क्रिनशॉटकडे आश्चर्याने पाहिले जात आहे. यासोबतच ही सुट्टी अप्रुव्ह केल्यानंतर बॉस ने दोन मेसेजही डिलीट केले आहेत. हे मेसेज का डिलीट केले आहेत. असा सवाल आता नेटकरी विचारत आहेत.

 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक, शिंदे सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

खरं तर हा 13 सप्टेंबरचा हा स्क्रिनश़ॉट आहे. आकाश दुगाड नावाच्या एक्स (ट्विटर) युझरने हा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने 10 दिवसाची सुट्टी 2 दिवसात मंजूर झाल्याचे म्हटले आहे. त्याच्या या पोस्टला 5 लाख 57 हजार व्हुज मिळाले आहेत.तर साडे चार हजाराहून अधिक लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत.

    follow whatsapp