Pune Ganesh Visrjan : पुण्यातील गणेशोत्सवाला जशी मोठी परंपरा आहे. तशीच परंपरा तेथील गणेश विसर्जन मिरवणुकीलाही आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या गर्दात पुण्यातील अनेक मंडाळांच्या बाप्पाला निरोप दिला जातो. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील अनेक मंडळांकडून वेगवेगळ्या ढोल ताश्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे ती पाहण्यासाठी गर्दीचा उच्चांकही गाठला जातो. गणेश भक्तांच्या गर्दीमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडू नये यासाठी पुणे पोलीस (Pune Police) आणि वाहतूक व्यवस्थेकडून नियोजन (Pune traffic planning) करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना विनात्रास प्रवास करता येणार आहे. (ganesh visarjan procession mirvanuk pune city changes traffic system)
ADVERTISEMENT
महत्वाच्या मार्गात बदल
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे जनसामान्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो. त्यासाठी पुणे वाहतूक व्यवस्थेकडून महत्वाच्या मार्गात बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हे ही वाचा >> Sharad Pawar: ‘मोदींचं ते वक्तव्य क्लेशदायक’, पवारांची घणाघाती टीका
लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर
पुण्यातील अनेक मंडळांच्या बाप्पांचे गुरुवारी विसर्जन होत आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे लाखोंच्या संख्येने नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी होत असते. शिवाजी रोड, फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड, प्रभात रोडवर नागरिकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे पुणे पोलीस आणि वाहतूक व्यवस्थेकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> MNS : ‘दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश’; राज ठाकरे भडकले, ‘मूठभर व्यापाऱ्यांनी…’
हे मार्ग असणार बंद
गणेश विसर्जन मिरवणुकीला नागरिकांची प्रचंड गर्दी जमते, त्यामुळे पुण्यात वाहतुकीचाही बोजवारा उडतो. त्यामुळे पुणे पोलीस आणि वाहतूक व्यवस्था प्रशासनाने 17 मार्गावरील रस्ते पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. पुण्यातील शिवाजी रोड,लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रोड, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रोड ( व्होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रोड, प्रभात रोड, बगाडे रोड, गुरुनानक रोड बंद असणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना जर बाहेर निघायचे असेल तर वाहतूक व्यवस्था प्रशासनाने सांगितलेले बंद मार्ग कोणते आहेत त्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
ADVERTISEMENT