लाइव्ह

Ganpati Visarjan Live : टाळ, मृदुंगाच्या गजरात लालबाग दुमदुमलं! 'लालबागचा राजा' कुठे पोहोचला?

मुंबई तक

17 Sep 2024 (अपडेटेड: 17 Sep 2024, 02:38 PM)

Ganpati Visarjan Live Updates : गणपती बाप्पाच्या विसर्जनाचे सर्व लाईव्ह अपडेट्स मुंबई Tak च्या 'या' विशेष लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा...

Mumbaitak
follow google news

Ganpati Visarjan Live Updates : 'ही समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशात या गजरात देव निघाले थाटा माटात... या चरणी तुझ्या हे देवा हे वाहतो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा, बाप्पा मोरया मोरया मोरया रे...'

ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या मुंबईचा राजा गणेशगल्ली, लालबागचा राजा, तेजूकाय, काळाचौकीचा महागणपती, चिंतामणी यांसह ठिकठिकाणी बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

गणपती बाप्पाच्या विसर्जनाचे सर्व लाईव्ह अपडेट्स मुंबई Tak च्या 'या' विशेष लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:00 PM • 17 Sep 2024
    समुद्राला येणार रात्री भरती, विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अलर्ट

    गणपत्ती बाप्पाचे समुद्रामध्ये विसर्जन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी महत्वाचा अलर्ट आहे. आज रात्री 11 वाजता समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत भाविक भक्तांनी समुद्र किनारी जाणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे भरतीपूर्वीच गणेशोत्सव मंडळांनी गणपती विसर्जन करण्याची शक्यता आहे.

     

  • 02:06 PM • 17 Sep 2024
    Pune Ganpati Visarjan : पुणे पोलिसांनी व्हिडीओ शेअर करत वाहातुकीबाबत दिली माहिती

    आज विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने पुणे पोलीसांकडून मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांच्या संदर्भात एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग, पर्यायी मार्ग, पार्किंगची सोय असे अनेक मुद्द्यांची माहीती देण्यात आली आहे.

     

  • 02:04 PM • 17 Sep 2024
    Ganpati Visarjan : धुळे शहरात वाजत गाजत गणपती विसर्जनाला सुरुवात

     

    धुळे शहरात वाजत गाजत गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतीसह मंडळांच्या गणपती मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या वतीने 11 ठिकाणी पांझरा नदी किनारी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कृत्रिम ड्रम ठेवण्यात आले आहेत. अनेक भाविकांनी हौदात गणेश मूर्तीचं विसर्जन केलंय.

     

  • 01:40 PM • 17 Sep 2024
    Ganpati Visarjan 2024 : ‘लालबागचा राजा’ गणपती बाप्पाची मूर्ती मंडपाबाहेर

    ‘लालबागचा राजा’ गणपती बाप्पाची मूर्ती मंडपाबाहेर आली असून गणरायाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, गुलाल उधळण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची तुफान गर्दी पहायला मिळतेय.

     

  • 12:14 PM • 17 Sep 2024
    Ganpati Visarjan 2024 : पुणे- मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात

    पुणे- मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात पोहोचला. पारंपरिक पद्धतीने पालखीत विराजमान असणाऱ्या गणपतीचं संबळ वादन करत, भंडारा, पिवळा धूर उधळत स्वागत करण्यात आलं.

     

  • 12:12 PM • 17 Sep 2024
    Ganpati Visarjan 2024 : मुंबई, पुण्यात जल्लोषात बाप्पाची मिरवणूक

    मुंबई, पुण्यात जल्लोषात बाप्पाची मिरवणूक… लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गर्दी… पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक

     

  • 12:11 PM • 17 Sep 2024
    Ganpati Visarjan 2024 : लालबागचा राजाची शेवटची आरती संपन्न

    लालबागचा राजाची शेवटची आरती संपन्न झाली आहे. गणपती बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीआधी लालबागचा राजाची शेवटची आरती करण्यात आली. आता थोड्याच वेळात लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

     

  • 10:21 AM • 17 Sep 2024
    Ganpati Visarjan 2024 LIVE : लालबागमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, भाविकांची तुफान गर्दी

    महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता लालबागमध्ये मोठ्या उत्साहात होत आहे. लालबागमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला

    लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर आज त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे, १लालबागमधील रस्ते आज गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून जाणार आहेत…

    जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाची आज राजेशाही मिरवणुक काढण्यात येणार आहे

    राजेशाही विसर्जन मिरवणूक तब्बल २४ तास चालणार आहे, उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन होणार आहे….

    बाप्पाचं मोहक रुप पाहण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी होऊ लागली आहे

    सकाळी ९:३० वाजता विधिवत पूजा आणि आरती करण्यात येणार आहे, त्यानंतर लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणुक सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधून निघणार आहे

     

follow whatsapp