आधी होती अलका, नंतर बनला अस्तित्व! बहिणीच्या मैत्रिणीसोबत थाटला संसार

प्रशांत गोमाणे

10 Dec 2023 (अपडेटेड: 10 Dec 2023, 11:08 AM)

अस्तित्वने त्याच्या 47 व्या वाढदिवशी मुंबईतील रुग्णालयात लिंग बंदलाची शस्त्रक्रिया पुर्ण केली होती. कारण त्याला एक स्त्री म्हणून वावरणे आरामदायी वाटत नव्हते. शस्त्रक्रियेपूर्वी त्याचे नाव अलका होते.

girl got gender changed and become men and married with sister friend madhya pradesh indore story

girl got gender changed and become men and married with sister friend madhya pradesh indore story

follow google news

देशभरात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. या लग्नाच्या सीझनमध्ये जागोजागी ढोल नगाडे वाजून लग्न सोहळे पार पडतायत. अशातच लग्नाची एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. या लग्नात एका मुलीने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर मुलीने मुलगा बनून तिच्या बहिणीच्या मैत्रिणीशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाची आता सोशल मीडियावर रंगली आहे. (girl got gender changed and become men and married with sister friend madhya pradesh indore story)

हे वाचलं का?

‘अलका’ने दोन वर्षापूर्वीच लिंग बदलाची शस्त्रक्रिया पूर्ण केली होती. ही शस्त्रक्रिया करून ‘अलका’ ‘अस्तित्व’ बनली होती. त्यानंतर अस्तित्वने आस्था नावाच्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी अर्ज केला होता. अस्तित्वने लग्नाच्या नोंदणीच्या अर्जासोबत, आवश्यक वैद्यकीय आणि इतर कागदपत्रे प्रशासनाला सादर केली होती, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (ADM) रोशन राय यांनी दिली.

हे ही वाचा : Manoj Jarange : “फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसंच…”, जरांगेंना संताप अनावर

लग्न जोडप्याच्या परस्पर संमतीनेच झाले होते. आणि प्रशासनासमोर कोणीही त्याविरुद्ध कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता. परिणामी, विहित प्रक्रियेनुसार, त्यांच्या नावाने विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र विशेष अंतर्गत जारी करण्यात आले होते. या लग्नानंतर अस्तित्व आणि आस्था यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 

अस्तित्व हा प्रॉपर्टी डिलर आहे. अस्तित्वने त्याच्या 47 व्या वाढदिवशी मुंबईतील रुग्णालयात लिंग बंदलाची शस्त्रक्रिया पुर्ण केली होती. कारण त्याला एक स्त्री म्हणून वावरणे आरामदायी वाटत नव्हते. शस्त्रक्रियेपूर्वी त्याचे नाव अलका होते. अस्तित्वने आता रितू नावाच्या महिलेसोबत लग्न केले आहे. रितुला तो प्रेमाने आस्था नावाने हाक मारतो.”मला नेहमीच आस्था नावाच्या काल्पनिक पात्राबद्दल वाटले आहे. मी विचार केला की जेव्हाही मी लग्न करेन, तेव्हा मी माझ्या पत्नीचे नाव आस्था ठेवेन. आस्थाला माझ्या आयुष्यातील जोडीदार म्हणून पाहून मला जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे अस्तित्व या लग्नावर म्हणतो.

हे ही वाचा : Mayawati : बसपा अध्यक्षा मायावतींचा वारसदार ठरला! कोण आहे आकाश आनंद?

‘अस्तित्वसोबतच्या माझ्या लग्नामुळे मी खूप आनंदी आहे. माझी अस्तित्वाशी पहिली भेट त्याच्या बहिणीच्या माध्यमातून झाली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आम्ही एकमेकांना समजून घेत होतो. तेव्हा आम्हाला समजले की आम्ही जोडपे म्हणून एकमेकांसाठी परफेक्ट आहोत, असे आस्था म्हणते.

    follow whatsapp