Gold Price today in Mumbai : भारतीय सराफा बाजारात मंगळवारी (6 ऑगस्ट) सोने-चांदीचे भाव आणखी घसरले. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 68 हजरा रुपयांवर असून, चांदी प्रति किलो 78 हजारांवर आहे. राष्ट्रीय स्तरावरील 999 शुद्धता असणारे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 68904 इतका आहे. 999 शुद्धता असणाऱ्या चांदीचा भाव किलोला 78444 रुपये आहे. (Gold Price in Mumbai, pune, Maharashtra)
ADVERTISEMENT
सोन्याचे दर किती झाले कमी?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोमवारी (5 ऑगस्ट) सायंकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 69117 रुपये होते. जो 6 ऑगस्ट रोजी सकाळी घसरणीसह प्रति 10 ग्रॅमला 68904 रुपयांवर आला. शुद्धता श्रेणीनुसार सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत.
हेही वाचा >> शेख हसीनांना देशातून पळायला लावणारं प्रकरण काय?
999 शुद्धता सोने (प्रति 10 ग्रॅम) 213 रुपयांनी स्वस्त झाले. 995 शुद्ध सोन्याच्या किंमती (प्रति 10 ग्रॅम) 212 रुपयांनी कमी झाले. 916 शुद्धतेचे सोने प्रति 10 ग्रॅम 195 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचबरोबर 750 शुद्धतेचे सोने प्रति तोळा (10 ग्रॅम) 160 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 585 शुद्धतेचे सोने प्रति तोळा 124 रुपयांनी कमी झाले आहे. तर 999 शुद्धता असणारी चांदी प्रति किलो 506 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
हेही वाचा >> अवजड बॅग, रक्ताचे डाग अन्...; दादर स्थानकात फुटलं मित्राच्या हत्येचे बिंग
मिस्ड कॉल अन् कळेल सोन्या चांदीचा भाव
केंद्र सरकारने घोषित केलेल्या सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार, रविवारी IBJA कडून सोने-चांदीचे दर जाहीर केले जात नाही. मात्र, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोन्याचे भाव तुम्ही मिस्ड कॉल करून जाणून घेऊ शकता. यासाठी 8955664433 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर काही वेळातच मेसेज येईल, ज्यावर सोने-चांदीचे दर असतील.
ADVERTISEMENT