Howara-CSMT Express News : प्रवासी गाढ झोपेत असताना हावडा-मुंबई एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. हावडा एक्स्प्रेसचे तब्बल 18 डब्बे रुळावरून घसरले. झारखंडमध्ये पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. (Howara-CSMT Express derailed near Chakradharpur)
ADVERTISEMENT
हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला आहे. रेल्वेचे 18 डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या या अपघातात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसह एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.
हावडा मुंबई एक्स्प्रेस अपघातग्रस्त कशी झाली?
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 12810 हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे 18 डबे चक्रधरपूरजवळ पहाटे 3:45 वाजता चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान वेस्ट आउट आणि बारांबो दरम्यान रुळावरून घसरले आहेत.
हेही वाचा >> अजित पवारांच्या जागेवर भाजपचा दावा, मावळमध्ये नवा तिढा
एसईआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "मुंबई-हावडा मेलचे अनेक डबे बाराबांबोजवळ रुळावरून घसरले. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर बारांबो येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. आता त्यांना पुढील उपचारांसाठी चक्रधरपूरला नेण्यात आले आहे. मदतकार्य अजूनही सुरूच आहे."
स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सेराईकेला-खरसावन जिल्ह्यातील खरसावन ब्लॉकमधील पोटोबेडा येथे हा रेल्वे अपघात झाला. ते म्हणाले, "या अपघातात मुंबई-हावडा मेल आणि मालगाडीचा समावेश आहे. किती प्रवासी जखमी झाले आहेत, याची माहिती घेतली जात आहे."
हावडा एक्स्प्रेसज, ६ प्रवासी जखमी
चक्रधरपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून चक्रधरपूर रेल्वे विभागाचे अधिकारी, रिलीफ ट्रेन आणि अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या घटनेत 6 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे. याशिवाय, बारांबोजवळ ट्रेन क्रमांक 12810 रुळावरून घसरल्याच्या घटनेसाठी प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक 0651-27-87115 जारी केला आहे.
हेही वाचा >> विशाल पाटलांचं लोकसभेत घणाघाती भाषण; म्हणाले,''17 खासदारांना तरी...''
या रेल्वे अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले आहेत. त्याचवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांसह एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीची टीम पोहोचली आहे.
ADVERTISEMENT