‘मला आमदारकी आणि मंत्रिपदाची पर्वा नाही’, भुजबळांनी ठणकावून सांगितले

मुंबई तक

13 Jan 2024 (अपडेटेड: 13 Jan 2024, 04:02 PM)

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही जर दबाव आणत असाल तर आम्हीही काही कमी नाही. आम्हीही काय मेल्या आईचं दूध प्यायलो नसल्याचे सांगत जरांगे पाटील यांचे नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

If you create pressure for Maratha reservation we can also create pressure for OBC reservation Chhagan Bhujbalanche Maratha Samajala appeal

If you create pressure for Maratha reservation we can also create pressure for OBC reservation Chhagan Bhujbalanche Maratha Samajala appeal

follow google news

Maratha Reservation : आरक्षणावरून जे आमच्या विरोधात जे शक्ती देतात, ज्यांना पाठबळ देतात त्यांना आगामी काळातील निवडणुकीत आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी बीडमधील ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये दिला. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरूनच जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचा सुसंस्कृतपणा काढत तुम्ही स्वतःला काय समजता असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. छगन भुजबळ यांनी  आज बोलताना जरांगे-पाटील यांचे नाव न घेता म्हणाले तुम्ही म्हणता आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असं आवाहन तुम्ही जर आम्हाला देत असाल तर मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) मिळणारच नाही असा थेट इशाराच भुजबळांनी पुन्हा एकदा दिला.

हे वाचलं का?

आम्ही मेल्या आईचं…

मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या एल्गार मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आरक्षणासाठी दबाव निर्माण करत असाल, मुंबईत चार ते पाच लाख आंदोलनकर्ते घेऊन येऊ असा इशारा देत असाल तर आम्हीही काही मेल्या आईचं दूध प्यायलो नाही असा टोलाही त्यांनी जरांगे पाटील यांना त्यांनी लगावला. यावेळी छगन भुजबळांनी मला राजकीय भविष्याची, आमदारकी आणि मंत्रिपदाचीही पर्वा नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> Ayodhya Ram Mandir: कोण आहेत हे 4 शंकराचार्य? राम मंदिरावेळीच त्यांची का होतेय चर्चा?

सर्वांचे आरक्षण धोक्यात

मराठा समाज जर दबाव निर्माण करत असाल तर दलित, आदिवासी आणि ओबीसी वर्गानेही मग दबाव निर्माण करणे गरजेचे असल्याचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. कारण आजच्या काळात ओबीसी समाज धोक्यात आहेत. त्याचबरोबर आजच्या काळातील प्रत्येक वर्गाचे आरक्षण धोक्यात येत असल्याचे त्यांनी आज सांगत जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात येणार असल्याचा इशाराच त्यांनी मागास समाजाला दिला आहे.

मराठा आरक्षण कसं काय?

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून टीका करताना त्यांनी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी थेट तुम्ही जर आमचंच आरक्षण घ्यायला आला असाल तर आम्ही तुमच्याविरोधात जाणारच असल्याचे सांगितले. ओबीसी वर्गामध्ये जे जे वर्ग आहेत आज त्यांना सगळ्यांना बाहेर काढण्याची मागणी होते आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण द्या अशी कशी काय मागणी तुम्ही करु शकता असा सवालही त्यांनी मराठा आरक्षण मागणाऱ्यांना केला आहे.

    follow whatsapp