Extramarital affair : विवाहाला एक पवित्र बंधन मानले जाते, मात्र आपल्या जीवनसाथीदाराबरोबर (life partner) नाते चांगले नसेल तर मात्र नात्याला पूर्णविराम मिळत असतो. सध्याच्या काळात समाजात विवाहबाह्य संबंधाची प्रकरणंही खूप वाढत आहेत. त्यामुळे त्यातून हेच सिद्ध होते की, अनेक लोकं आपल्या वैवाहिक आयुष्यात (married life) ती सुखी नाहीत. तर कधी कधी हेही नाकारता येत नाही की, काही लोकं विनाकारण आपल्या जीवनसाथीदाराबरोबरच धोका देत असतात. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही सहभाग आहे. (India have extramarital affairs 7 out of 10 women survey conducted Glidden App has revealed)
ADVERTISEMENT
महिलांचे विवाहबाह्य संबंध
भारतात 5 लाखापेक्षा जास्त युजर्स असलणाऱ्या ग्लिडेन ॲपद्वारे ज्या महिलांचे लग्न झाले त्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यातून ही माहिती समजली की, अनेक महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे दिसून आले आहे.
हे ही वाचा >> MLA Disqualification Case : ‘सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्या’, ठाकरे गटाचा युक्तिवाद
वैवाहिक आयुष्याचा कंटाळा
ज्या महिलांचे सर्वे करण्यात आला त्यातून हे स्पष्ट झाले की, भारतातील 10 पैकी 7 महिला आपल्या नवऱ्याला यासाठी धोका देतात की, ते त्यांच्या घरकामामध्ये अजिबात मदत करत नाहीत. तर तेवढीच संख्या ज्यांना वैवाहिक आयुष्याचा कंटाळा आला आहे, त्या महिलाही इतर पुरुषांबरोबर रिलेशनशिपमध्ये असतात.
हे ही वाचा >> Shiv sena MLAs case : सुनावणीत काय घडलं? ठाकरेंच्या नेत्याने सांगितली Inside Story
नातंही अधिक मजबूत
तर त्याच सर्वेतून हेही माहिती समोर आली आहे की, 37 टक्के महिला यासाठी धोका देतात की, त्यांना नवीन नातेसंबंध जोडायचे असतात, आणि ते नातंही त्या अधिक मजबूत करतात. तर मार्केटिंग स्पेशलिस्ट म्हणतात की, याचा अर्थ असाही होतो की, विवाहबाह्य संबंध हे मोडणारे लग्नही त्यामुळे वाचू शकते असं मतंही त्यांनी व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT