Brijesh Singh: सीएम शिंदेंच्या कार्यालयात नियुक्ती, कोण आहेत सिंह?

भाग्यश्री राऊत

21 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 08:53 PM)

Senior IPS officer Brijesh Singh appointed as principal Secretary to CMO : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार जाऊन राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. त्यानंतर नव्या सरकारने प्रशासकीय पातळीवर अनेक बदल केले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. बदल्या आणि बढत्यांमुळे काही अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आली. असंच एक नाव सध्या चर्चेत आलं असून, ते […]

Mumbaitak
follow google news

Senior IPS officer Brijesh Singh appointed as principal Secretary to CMO : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार जाऊन राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. त्यानंतर नव्या सरकारने प्रशासकीय पातळीवर अनेक बदल केले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. बदल्या आणि बढत्यांमुळे काही अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आली. असंच एक नाव सध्या चर्चेत आलं असून, ते आहे ब्रिजेश सिंह (Brijesh Singh) यांचं. सिंह यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण ठरलं, त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कार्यालयात (Maharashtra Chief Minister) प्रधान सचिव (Principal Secretary) म्हणून झालेली नियुक्ती. आता हे अधिकारी नेमके कोण? त्यांना कोणतं पद मिळालं? हेच समजून घेऊयात…

हे वाचलं का?

आयपीएस ब्रिजेश सिंह हे देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. आता त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागानं सोमवारी त्यांच्या नियुक्तीसंदर्भातील आदेश काढला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून काम पाहणारे ब्रिजेश सिंह हे पहिलेच आयपीएस अधिकारी असावेत. त्यामुळेच सिंह यांच्या नियुक्तीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

सध्या शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून भूषण गगरानी काम पाहतात, तर विकास खारगे हे प्रधान सचिव आहेत. आता त्यांच्या सोबतीला ब्रिजेश सिंह हे दुसरे प्रधान सचिव आले आहेत.

Deven Bharti ची नियुक्ती! फडणवीसांच्या निर्णयाचे माजी पोलीस आयुक्तांनी सांगितले धोके

ब्रिजेश सिंह हे 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजेच 2014 ते 2019 या काळात ते माहिती आणि जनसंपर्क खात्याचे महासंचालक होते. याशिवाय सायबर गुन्हे शाखेचा कार्यभारही त्यांच्याकडे होता.

2019 मध्ये राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली. ब्रिजेश सिंह यांची होमगार्डच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली. पण, आता शिंदे-फडणवीसांचं सरकार येताच त्यांची नियुक्ती थेट मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आली आहे.

Deven Bharti : ऐतिहासिक नियुक्ती… फडणवीसांशी जवळीक, कोण आहेत भारती?

शिंदे-फडणवीसांचं सरकार येताच मोठे प्रशासकीय बदल

शिंदे-फडणवीसांचं सरकार येताच पुन्हा मोठे प्रशासकीय बदल होऊ लागले आहेत. आधी देवेन भारती यांच्यासाठी मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद तयार करण्यात आलं. त्यानंतर प्रवीण परदेशी यांची निवृत्तीनंतरही राज्यात नव्यानं नियुक्ती केली गेली. आता ब्रिजेश सिंह यांना मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव पद देण्यात आलं. हे तिन्ही अधिकारी फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री असले तरी फडणवीसांचा प्रशासनात दबदबा वाढल्याचं बोललं जातंय.

    follow whatsapp