Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियांनी जोडीदारांसोबतचे नाते तोडले, कारण…

भागवत हिरेकर

• 04:49 PM • 20 Oct 2023

Prime Minister Georgia Meloni has separated from her partner Andrea Giambruno : आंद्रिया हा मीडियासेटच्या न्यूज टॉक शो डायरियो डेल जिओर्नोची अँकर आहे, ज्याचे दोन ऑफ-एअर रेकॉर्डिंग दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते.

Italy's PM Georgia Meloni separated from partner Andrea Giambruno

Italy's PM Georgia Meloni separated from partner Andrea Giambruno

follow google news

Giorgia Meloni Husband : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या आपल्या जोडीदारापासून विभक्त झाल्या आहेत. मेलोनींच्या जोडीदाराने आपल्या महिला सहकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर मेलोनींनी पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. इटलीच्या पंतप्रधानांचा जोडीदार आंद्रिया गियामब्रुनो हे एक टीव्ही पत्रकार आहे, ज्याचे दोन ऑफ-एअर रेकॉर्डिंग दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते, त्यानंतर ते वादात सापडले होते. (Italian Prime Minister Georgia Meloni has separated from her partner.)

हे वाचलं का?

आपल्या जोडीदारापासून विभक्त झाल्याची बातमी देताना, इटलीच्या पंतप्रधानांनी लिहिले आहे की, ‘जवळपास 10 वर्षे टिकलेले आंद्रिया जियाम्ब्रुनोसोबतचे माझे नाते आता संपुष्टात आले आहे.’

आंद्रिया हा मीडियासेटच्या न्यूज टॉक शो डायरियो डेल जिओर्नोची अँकर आहे, ज्याचे दोन ऑफ-एअर रेकॉर्डिंग दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते. या रेकॉर्डिंगमध्ये तो एका महिला सहकाऱ्याबद्दल असभ्य आणि अश्लील शेरेबाजी करताना दिसत आहे.

जॉर्जियांना आंद्रियापासून सात वर्षांची मुलगीही आहे. मेलोनींनी पुढे लिहिले की, “आम्ही एकत्र घालवलेल्या सुंदर वर्षांसाठी, आम्ही एकत्र आलेल्या अडचणी आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मुलगी जेनेव्हरा यासाठी मी त्याचे आभार मानते. आमचे मार्ग काही काळापासून वेगळे झाले आहेत आणि आता ते स्वीकारण्याची वेळ आली आहे.”

“आम्ही जे एकत्र क्षण घालवले, ते जपून ठेवेन. मी आमची मैत्री जपून ठेवेन आणि सात वर्षाच्या आमच्या मुलीची काळजी घेईन. मी जसं माझ्या आईवडिलांवर प्रेम करते, तसंच ती आमच्यावर करते. मला आता याबद्दल काहीही बोलायचं नाहीये.”

मेलोनी या ऑक्टोबर 2022 मध्ये सत्तेवर आली. जोडीदारापासून विभक्त झालेल्या एकट्या आईने त्यांचे संगोपन केले होते.

काय आहे ऑफ एअर रेकॉर्डिंगमध्ये?

मीडियासेट शोमध्ये प्ले केलेल्या पहिल्या ऑफ-एअर रेकॉर्डिंगमध्ये, आंद्रिओने एका महिला सहकाऱ्याकडे तिच्या केशरचनेबद्दल केलेल्या टीकेबद्दल तक्रार करतो. मग तो त्यांना विचारतो, ‘मी तुम्हाला आधी का भेटलो नाही?’

दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये, तो एका महिला सहकाऱ्याला सांगताना ऐकू येतो की त्यांनी शोमध्ये दुसरी अँकर घ्यावी. तो म्हणतो, ‘आम्ही थ्रीसम किंवा फोर्ससम करतो.’

सप्टेंबरमध्येही आंद्रियाने एक कमेंट केली होती, ज्यामुळे बराच गदारोळ झाला होता. जर महिलांना बलात्कार टाळायचा असेल तर त्यांनी दारू पिणे टाळावे, असे तो म्हणाला होता.

अनेक हायप्रोफाईल प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आंद्रियाने हे कमेंट ऑन एअर केले आहे. त्यानंतर मेलोनी या जोडीदाराचा बचाव करताना दिसल्या होत्या. यावेळी मात्र मेलोनी म्हणाल्या की, “त्यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला.”

आंद्रियानेही हवामान बदल नाकारणारी टिप्पणी केली होती. जुलैमध्ये जेव्हा इटलीमध्ये प्रचंड उष्णता वाढली होती, तेव्हा त्याने सांगितले होते की, उन्हाळ्यात गरमी असणे ही बातमी नाही.

मेलोनी आणि आंद्रिया पहिल्या नजरेतच पडले होते प्रेमात

आंद्रियाने एका मुलाखतीत मेलोनींना भेटण्याचा किस्सा शेअर केला होता. दिवसभर राजकीय सभा घेतल्यानंतर मेलोनी या मुलाखतीसाठी मीडियासेट स्टुडिओत आल्याचे त्यांनी सांगितले होते. मग मेलोनींनी तिची अर्धवट खाल्लेली केळी आंद्रियाला दिली होती. आंद्रियाने मेलोनींसोबतच्या भेटीचे वर्णन पहिल्या नजरेतील प्रेम असे केले होते.

    follow whatsapp