Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेत भाविकांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे.या घटनेत गोळीबारात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. या घटनेने जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ माजली आहे. (jammu kashmir news terrorist open fire on passenger bus 10 killed)
ADVERTISEMENT
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुंफा यात्रेसाठी भाविकांची एक प्रवासी बस जात होती. या बसवर आज संशयित दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली होती. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हे ही वाचा : Pankaja Munde : 'तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ...', पंकजा मुडेंची भावनिक साद
"अहवालानुसार शिव खोरीहून कटरा येथे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खोऱ्यात जाऊन कोसळली होती. या घटनेत 33 जण जखमी झाल्याची माहिती आहे एसएसपी रियासी मोहिता शर्मा यांनी दिली आहे. तसेच बचाव कार्य पूर्ण झाले आहे. प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. शिवखोडी तीर्थक्षेत्र सुरक्षित करण्यात आले असून परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या घटनेत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ADVERTISEMENT