लाइव्ह

Maharashtra Budget Session 2024 Live : काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा झटका, बसवराज पाटील, रश्मी बागल भाजपात

मुंबई तक

27 Feb 2024 (अपडेटेड: 27 Feb 2024, 07:50 PM)

माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि करमाळा येथील ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि करमाळा येथील ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

follow google news

Maharashtra assembly Interim Budget session 2024 LIVE : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, दुपारी दोन वाजता अर्थमंत्री अजित पवार हे अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार बजेटमधून कोणत्या घटकांना काय देणार, हे महत्त्वाचं असणार आहे. यासंदर्भातील सर्व अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 07:50 PM • 27 Feb 2024
    काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा झटका, बसवराज पाटील, रश्मी बागल भाजपात

    माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि करमाळा येथील ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या  दोन्ही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 

  • 03:32 PM • 27 Feb 2024
    काँन्ट्रॅक्टर मित्र जोमात, शेतकरी कोमात -उद्धव ठाकरे

    अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे म्हणाले, "जयंतरावांनी जे म्हटलं ते बरोबर आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. काल-परवा राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका जसा बसला, तसा महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला या घोषणांच्या पावसाचा फटका बसेल की, काय अशी शक्यता आहे. याचं कारण असं विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे." 

    "शेतकरी आक्रोश करतोय, त्याच्या पदरात काहीच पडलेलं नाही. या सरकारचा दीड-दोन वर्षातील कारभार पाहिलात... विशेषतः मी मुंबई पुरतं जरी बोललो तर मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे. आणखी काही घोटाळा आहे. टेंडरवर टेंडर हे लोक काढताहेत. टेंडर काढल्यावर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो. मग, ते पुन्हा टेंडर काढतात.  प्रत्यक्षात काम काहीच होत नाही."

    "महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे. कारण अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही. शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि औषधाविना मृत्यू झालेले आपण बघितले. तिकडे लक्ष दिले गेले नाही. नवीन रुग्णालय, बेड वाढवणार अशा काही घोषणा आहेत." 

  • 02:59 PM • 27 Feb 2024
    अयोध्या, श्रीनगरमध्ये महाराष्ट्र सदन

    - लोणावळ्यात ३३३ कोटी ५६ लाख किंमतीचा जागतिक स्कायवॉक प्रकल्प.
    - राज्यातील पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जम्मू काश्मीरमधीर श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय.
    - दोन्ही ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी जागा घेतल्या असून, ७७ कोटींची तरतूद.

  • 02:59 PM • 27 Feb 2024
    'आई-बहिणीवरून अपशब्द वापरले...', मनोज जरांगेंनी मागितली माफी!

    मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची माफी मागितली आहे. 'आई-बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर दिलगीरी व्यक्त करतो.' असं माफी मागत जरांगे पाटील म्हणाले. 

  • 02:55 PM • 27 Feb 2024
    अर्थसंकल्प २०२४ - महत्त्वाच्या घोषणा

    - नागपूरच्या धर्तीवर पुण्यातील औंध येथे एम्स रुग्णालय स्थापन करण्याचे नियोजन. 
    -महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतंर्गत वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब १ लाख ५० हजारावरून ५ लाख करण्यात आली आहे. 
    -गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे. 
    - संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांना अर्थसहाय्य १ हजारावरून १ हजार ५०० रुपयांची वाढ.
    - संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या भागभांडवलाच्या अनुदानात वाढ.

  • 02:46 PM • 27 Feb 2024
    शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    - विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन जागृतीसाठी माझी वसुंधरा अभियानातंर्गत सर्व शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येत आहे. 
    - अटल बांबू समृद्धी योजनेतंर्गत १० हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड. 
    - जलयुक्त शिवार अभियान २ अतंर्गत ५ हजार ७०० गावांना १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
    - १५ हजार ३९० कामे पूर्ण झाली आहेत. 
    - पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेतंर्गत सोलर पॅनेल बसवण्यासाठी ७८ हजार मर्यादेपर्यंत अनुदान देणार.
    - ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत मिळणार.
    - शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर वीजपंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. यातंर्गत ८ लाख ५० हजार सौर कृषीपंप बसवले जाणार.
     

  • 02:39 PM • 27 Feb 2024
    १ कोटी २२ लाख कुटुंबांपर्यंत नळजोडणी... अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे

    - मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून २५ हजार उद्योग घटक तयार करण्याचे उद्दिष्ट. ३० टक्के उद्योजक महिला असतील. यातून ५० हजार रोजगार निर्मिती होईल.
    - मेक इन इंडिया धोरणातंर्गत एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार नवी मुंबईत युनिटी मॉल उभारण्यासाठी १९६ कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू.
    - हर घर नल, हर घर जल नुसार प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जल जीवन मिशन अभियानातून १ कोटी ४६ लाख ६४ हजार ३८२ नळ जोडण्यांचे उद्दिष्ट. जानेवारी महिन्यापर्यंत त्यापैकी १ कोटी २२ लाख १० हजार ४७५ नळजोडण्या दिल्या आहेत. 

  • 02:31 PM • 27 Feb 2024
    भाजपनंतर शिवसेनेचेही 3 नेते लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण

    लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून तीन मंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चेत मंत्री तानाजी सावंत, संदीपान भुमरे आणि संजय राठोड यांची नावे पुढे येत आहेत. पक्षाकडून या मंत्र्यांच्या लोकसभा मतदार संघात सर्व्हेद्वारे आढावा घेण्यात येत असल्याचं दिसत आहे. 

  • 02:31 PM • 27 Feb 2024
    दावोसमध्ये ३ लाख कोटींहून जास्त गुंतवणूक

    -दावोसमध्ये १९ कंपन्यांसोबत सामंजस्य करार, ३ लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक आणि २ लाख रोजगार निर्मिती होईल. 
    - वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. शिधा पत्रिकेवर एका कुटुंबास एक मोफत साडी वाटप सुरू आहे. 
    -लघु वस्त्रोद्योग संकुल स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्यास मान्यता.
    - राज्यात १८ लुघ वस्त्रोद्योग स्थापन केली जाणार, त्यातून ३६ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित

  • 02:28 PM • 27 Feb 2024
    शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात काय?

    - शिर्डी विमानतळाच्या ५० हजार चौरस मीटर आधुनिक इमारतीचे काम लवकरच सुरू होणार.
    -छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळ विस्तारासाठी भूसंपादनसाठी ५७८ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर
    -नागपूर येथील मिहान प्रकल्प विस्तार आणि भूसंपादनासाठी १०० कोटींचा निधी
    -कोल्हापूर विमानतळ विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करू दिला जाणार.
    -बेलोरा विमानतळ धावपट्टी विस्ताराचे काम पूर्ण, रात्रीची सेवा सुरू करण्याचे काम सुरू.
    - नवी मुंबई विमानतळाचं काम वेगाने सुरू, पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत सुरू होणार.
     

  • 02:11 PM • 27 Feb 2024
    अजित पवारांच्या मोठ्या घोषणा, बजेटमध्ये काय?

    - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संग्रहालय वडज येथे उभारण्याचे जाहीर केले आहे. 
    - केंद्र सरकारकडून राज्याला जीएसटीचे ८ हजार ६,१८ कोटींची भरपाई मिळाली. 
    -भांडवली गुंतवणुकीसाठी ६ हजार ५७ कोटी ७३ लाख रूपयांचे ५० वर्षे मुदतीचे कर्ज मंजूर झाले. 
    - राज्यात सहा वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू झाल्या. 
    - राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५ हजार ५५४ कोटींची केंद्राकडून तरतूद

    - पायाभूत सुविधांबरोबरच लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. 
    - २२ पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यासाठी महामंडळ स्थापन करण्यात आली आहे.
    - अहमदनगर बीड परळी वैजनाथ, वर्धा यवतमाळ नांदेड, देसाईगंज गडचिरोली, नागपूर नागभीड रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर
    - कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक, सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गांसाठी भूसंपादनाचे काम सुरू
    - फलटण-पंढरपूर, तापा चिमूर वरोरा, जळगाव-जालना, नांदेड बिदर या रेल्वे मार्गांसाठी प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के आर्थिक सहभाग देण्यास राज्य सरकारची मान्यता. 

    - जालना-खामगाव, आदिलाबाद माहूर वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर यवतमाळ शंकुतला रेल्वे आणि पुणे-लोणावळ मार्गिका तीन व चार या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्याचा ५० टक्के सहभाग.

  • 12:15 PM • 27 Feb 2024
    काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील भाजपात करणार प्रवेश

    लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी विधान भवन या ठिकाणी दाखल झाले आहेत.

  • 11:47 AM • 27 Feb 2024
    जरांगे अडचणीत! एकनाथ शिंदे बरसले, विधान परिषदेत सगळं सांगितलं

     भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. 

    एकनाथ शिंदे यांच्या विधान परिषदेतील भाषणातील मुद्दे 

    - मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिलंय. मराठा आरक्षण दिलं आणि एकमताने दिलं.इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण दिलं.आरक्षण दिल्याबरोबर कोर्टात टिकणार नाही अशी चर्चा सुरू झाली हे दुर्देवी आहे.

    - अनेक आंदोलनं झाली, 56 मोर्चे झाले. शांततेत झाले. मराठा संयमी, शिस्तीने राहणारा आहे असं या मोर्चातून दिसलं.

    - आता जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली. आम्ही संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. नोंदी शोधल्या. पूर्वीपासून कायदा होता. 1967 पूर्वीचा कायदा होता त्यानुसार नोंदी शोधल्या.

    - जस्टीस शिंदे यांच्याबाबत जरांगे पाटील स्वतः म्हणाले की त्यांचे काम चांगले आहे ह्यांना मुदत वाढ दिली पाहिजे. ते सांगत गेले तसं करत गेलो. सरकारने पूर्णपणे मराठा समाजाला न्याय मिळेल तशी भूमिका घेतली. मग त्यांनी सरसकट मागणी केली. सरसकट आरक्षण देताच येणार नाही 

    - पहिल्यांदा तीन तीन न्यायाधीश पाठवले असं इतिहासात पहिल्यांदाच झालं. मग म्हणाले ओबीसीतून आरक्षण द्या. अशा त्यांच्या मागण्या बदलत गेल्या.

    - सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाला सोबत घेऊन निर्णय घेतला. पण जरांगे पाटील यांनी एकेरी शब्दात उल्लेख केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची काय काढायची ते काढली. मग उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर आरोप केले. असं चालतं का?

    - दगडफेक झाल्याचा अहवाल एसआयटीकडे आहे. दगडं कोणी हातात घेतले. आमदाराची फॅमिली घरात असताना घराची जाळपोळ केली. आता अहवालात सगळं आहे. आता सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही.

  • 11:35 AM • 27 Feb 2024
    SIT च्या घोषणेनंतर मनोज जरांगे सरकारवर बरसले!

    'आमच्या आई-बहिणीच्या छाताडावर नाचलात, गोळ्या घातल्यात तुम्हाला तेव्हा नाही का वाईट वाटलं? माझ्या आई-बहिणींच्या मुंडक्यावर पाय दिले, एका महिलेला 20-20 पोलीस मारत होते. तुमच्या नुसत्या आई म्हणलो तर किती लागलं. तुम्ही आमच्या आई-बहीण उभ्या चिरल्यात, तेव्हा कुठे गेलेलात SIT नेमणाऱ्यांनो? सत्ता हातात आली म्हणून दुरूपयोग करता की काय? SIT च्या चौकशीला घाबरून मी माझ्या आई-बहिणीचे मुंडके नाही पडू देणार.' असं मनोज जरांगे म्हणाले.   ' 

  • 10:18 AM • 27 Feb 2024
    'महाराष्ट्र बेचिराख', मनोज जरांगेंच्या विधानाचे विधानसभेत पडसाद

    पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आशीष शेलार यांनी मुद्दा मांडला. ते म्हणाले, "महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा मनोज जरांगे यांनी केली आहे. ही भाषा आणि ही टिप्पणी काय सांगते, तर एक भयंकर कट रचला होता किंवा रचला आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याचे कटकारस्थान आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा कुणी करत असेल, तर विरोधकही याला पाठिंबा देतील. न्यायालयही सांगत आहे की, गांभीर्याने घ्या."

  • 10:09 AM • 27 Feb 2024
    महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांचं पहिलं बजेट

    महायुती सरकारचं बजेट सादर करण्याची ही अजित पवारांची पहिलीच वेळ आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे बहुसंख्य आमदारांसह महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अर्थमंत्री म्हणून ते काम बघत असून, त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

follow whatsapp