महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (८ जून) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल महामंडळाच्या संकेतस्थळावर बघता येणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही निकालाबद्दल ट्विट करत माहिती दिलीये.
ADVERTISEMENT
बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येणार आहेत. त्याचबरोबर त्याची प्रिंट घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांकडून १७ जून रोजी दुपारी ३ वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी दिली.
राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खाली देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावर (web sites) उद्या दुपारी १ नंतर पाहता येणार आहे.
http://www.indiatoday.in/education-today/result
निकाल कसा बघायचा?
– बारावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम वर दिलेल्या वेबसाईटवर जा. (maharesult.nic.in , hscresult.mkcl.org , msbshse.co.in)
– होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, ही साईट निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
– दिलेल्या रकान्यात तुमचा रोल नंबर व आईचं नाव टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. नंतर तुम्ही खाली स्क्रोल करून डाउनलोड करू शकता.
गुण पडताळणीसाठी १० जूनपासून करता येणार अर्ज
ऑनलाइन निकाला जाहीर झाल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे १० जूनपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाइटवरून विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
गुण पडताळणीसाठी १० ते २० जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी १० ते २९ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यी ऑनलाइन पद्धतीने शुल्कदेखील भरू शकणार आहेत.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्यक असून, छायाप्रत मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. नापास विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार असून, त्यासाठी १० जूनपासून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
ADVERTISEMENT