Maharashtra Breaking News Live : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहेत. जागावाटप, उमेदवारांची चाचपणी, मतदारसंघांसाठी रणनीती या सगळ्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रीत केले गेले असल्याचे दिसत आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीतील शिवसेना यूबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस या राजकीय पक्षांबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
राज्यभर नेते फिरू लागले असून, सत्ताधारी विविध योजना लोकांपर्यंत घेऊन जात आहेत. तर दुसरीकडे विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरताना दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दाही दिवसेंदिवस ज्वलंत बनताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय घटना-घडामोडींसह इतर सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 10:50 PM • 06 Aug 2024Olympics News Live Vinesh Phogat Final: विनेश फोगटने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिक 2024 कुस्तीच्या अंतिम सामन्यात मारली धडक
Vinesh Phogat Final: भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने उपांत्य सामना जिंकून एक मोठा इतिहास रचला आहे. विनेश हिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिचा पराभव केला.
अंतिम फेरीत प्रवेश करून विनेशने तिचं पदक निश्चित केलं आहे. मंगळवारी तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. आता विनेश बुधवारी (7 ऑगस्ट) अंतिम सामन्यात सुवर्ण पदकासाठी लढताना दिसणार आहे.
- 05:08 PM • 06 Aug 2024Olympics News Live : Vinesh Phogat ची जबरदस्त कामगिरी; आता थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री!
विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने जपानची दिग्गज खेळाडू सुसाकीविरूद्ध विजय संपादन केला. जपानच्या या पैलवानाला पराभूत करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. विनेशने मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूचा पराभव केला. विनेशने सुरुवातीच्या फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन आणि ४ वेळा जागतिक चॅम्पियन राहिलेली युई सुसाकीला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. विनेशला विजयी घोषित करताच जपानच्या खेळाडूने पंचांची मदत घेत २ गुण नसल्याचा दावा केला. पण, निकाल विनेशच्याच बाजूने लागला अन् विजयावर शिक्कामोर्तब झाला.
- 03:35 PM • 06 Aug 2024Paris Olympics 2024: कुस्तीत विनेश फोगाटचा मोठा उलटफेर
विनेश फोगाट हिने कुस्तीतील पहिल्याच सामन्यात जपानची ऑलिम्पिंक सुवर्ण पदक विजेती युई सुसाकी हिला 3-2 असं पराभूत करत मोठा उलटफेर केला. विनेशने अगदी शेवटच्या क्षणी तीन गुण मिळवत हरणारा सामना जिंकला. - 03:34 PM • 06 Aug 2024Paris Olympics 2024 Niraj Chopra: सुवर्ण पदकाचा प्रमुख दावेदार नीरज चोप्राने गाठली अंतिम फेरी
भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत कमाल केली आहे. त्याने आपल्या पहिलाच थ्रो 89.34 मीटर लांब फेकून अंतिम फेरीसाठी थेट क्वॉलिफिकेशन केलं आहे. नीरजचा हा थ्रो सीजनचा बेस्ट थ्रो आहे.
- 02:14 PM • 06 Aug 2024Maharashtra News Update : पोहायला गेले अन् चार जणांचे जिव गेले
पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या झरी गावातील शिवारात ही घटना घडली.
झरी गावाच्या शिवारात मोठी खदाण आहे. या खदाणीत सेल्फी काढल्यानंतर पाच युवक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चार जणांचा बुडून मृत्यू झाला.
नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील हे तरुण असल्याची माहिती आहे. यातील एक जण वाचला आहे. वाचलेल्या तरुणाने सोबतचे तरुण पाण्यात बुडल्याची माहिती दिली.
काझी मुजमील,अफान, सय्यद सिद्दीकी, शेख फुजायल असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या चारही जणांचे मृतदेह जीवरक्षकांनी बाहेर काढले आहे.
- 10:47 AM • 06 Aug 2024Prakash Ambedkar : "जरांगेंकडे एका दगडात दोन पक्षी मारण्याची कला"
मनोज जरांगे पाटील म्हणालेले की प्रकाश आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीयच आहेत. त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, "हो. म्हणून तर त्यांना म्हणालोय की, त्यांच्यासारखा खेळ हा कुणीच करू शकत नाही. एका दगडात दोन पक्षी मारण्याची कला त्यांच्याकडेच आहे."
"आता माझं म्हणणं एवढंच आहे की, जरांगे पाटील यांनी २८८ जागा लढण्याची घोषणा केली आहे. तर त्यांनी त्या जागा लढाव्यात आणि गरीब मराठ्यांना न्याय द्यावा, ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे", असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
- 10:35 AM • 06 Aug 2024Maharashtra Live news : उद्धव ठाकरे दिल्लीत, संजय राऊत म्हणाले...
दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली.
"इंडिया आघाडीचे प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटी आहेत. काँग्रेसचे नेते, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होईल. उद्धव ठाकरेंचे दिल्लीत येण्याचे प्रयोजन तेच आहे. विधानसभा एकत्रितपणे कशा जिंकता येतील. जागावाटपात कोणतेही भेद-मतभेद नसावेत", अशी माहिती राऊत यांनी दिली.
- 08:24 AM • 06 Aug 2024Maharashtra News Live : जरांगे पाटील राज ठाकरेंना म्हणाले, 'चिल्लर'
आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरेंनी यांनी 'मला त्यातले काही कळत नाही', असे उत्तर दिले. त्याचबरोबर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधानही त्यांनी केले.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेबद्दल बोलताना मनोज जरांगे यांनी सुनावले. "मला त्यातले काही माहिती नाही, बोलणारे बोलत असतात. मराठ्यांनी ध्यान द्यायचे नाही. आपले काम करत राहायचे. लक्ष विचलित करण्यासाठी हे कुटाने सुरू आहेत. राज ठाकरे पण सत्तेचा एक भाग आहेत, अंग आहेत. चिल्लर म्हणायचे आणि मराठ्यांनी सोडून द्यायचे", अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT