लाइव्ह

Marathi News Live : मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक, हिंदुजा रूग्णालयाने दिली हेल्थ अपडेट

मुंबई तक

22 Feb 2024 (अपडेटेड: 22 Feb 2024, 10:13 PM)

Latest Marathi News Live : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीची तयारी सुरू...

Manohar Joshi's condition is critical, Hinduja Hospital gives health update

मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक, हिंदुजा रूग्णालयाने दिली हेल्थ अपडेट

follow google news

Maharashtra News Live : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र असून, दोन्ही आघाड्यांतील घटक पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे... नेत्यांचे दौरे आणि सभा सुरू असून, यासंदर्भातील ताजे अपडेट्स तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच ठिकाणी...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:15 PM • 22 Feb 2024
    मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक, हिंदुजा रूग्णालयाने दिली हेल्थ अपडेट

    माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारीला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांना कार्डिअ‍ॅकचा झटका आला होता. त्यांच्यावर सध्या उपचार सूरू आहेत.  ते सध्या आयुसीयूत असून त्यांच्यावर डॉक्टरांची टीम विशेष लक्ष ठेवून आहे. तसेच त्यांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी डॉक्टरांची टीम कार्यरत असल्याची माहिती हिंदुजा रूग्णालयाने पत्रक जारी करून दिली आहे. 

    दरम्यान याआधीसुद्धा मनोहर यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यावेळेस देखील त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे बुधवारी हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

  • 08:03 PM • 22 Feb 2024
    ''जयंत पाटील साहेबांसोबत कधीच गद्दारी करणार नाही''

    सुजय विखेंना म्हणावं नगर मधल्या सीटचं काय सुरू आहे, भाजपकडून ही सीट अजित पवारांनी मागितली आहे त्याचं आधी बघा...तुमच्यात डाव कुणी कुणाचा करतील ते बघा, असे रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच जयंत पाटील साहेबांसोबत राहतील, आमचा विश्वास ते साहेबांसोबत कधीच गद्दारी करणार नाही. आणि सुजय विखे काय सांगतात यावर काही ठरत नाही. 

    युगेंद्रने साहेबाना पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे. अजित दादांवर अन्याय झाला नाही. कुटुंबाला तुम्ही सोडलं आणि तुमच्या निर्णयामुळे एकटे पडला आहात. तुमच्या अवती भवती असणारे नेते कधी रिस्क घेणार नाहीत, हे कधीच लोकांमध्ये जाऊन निवडून येणार नाहीत हे दादांच्या कानात जाऊन सुनेत्रा वहिनींना उभं करण्यासाठी सांगत आहेत.

  • 04:03 PM • 22 Feb 2024
    'माझ्याविरूद्ध बोलण्यासाठी बारस्करांनी 40 लाख रूपये घेतले'- मनोज जरांगे

    'माझ्याविरूद्ध बोलण्यासाठी बारस्करांनी 40 लाख रूपये घेतले असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. सरकारचा हा ट्रॅप असल्याचा' आरोपही त्यांनी केला.

  • 03:51 PM • 22 Feb 2024
    जय शाहांचा उल्लेख, थेट अमित शाहांवर हल्ला, ठाकरे काय बोलले?

    भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना अमित शाह असं म्हणाले होते की, शरद पवारांना मुलीला (सुप्रिया सुळे), तर उद्धव ठाकरेंना मुलाला (आदित्य ठाकरे) मुख्यमंत्री करायचं आहे. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.

    चिखली येथील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही म्हणता की, घराणेशाहीच्या विरोधात आहात. आम्ही म्हणतोय की आम्ही तुमच्या हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात आहोत. अमित शाहांना काय जातंय बोलायला. अमित शाह काल परवा बोलले की, मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर घराणेशाही मूळापासून संपवून टाकतील."

    "कुणाला संपवणार आम्हाला? ही आमची घराणेशाही... लोक हेच आमचं घराणे आहे. काय बोलतात की, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. बरं ठिके, मला करायचं आहे, पण लोकांनी मतं दिली तर होतील ना? मुख्यमंत्री पद म्हणजे ते काय बीसीसीआयचं अध्यक्षपद नाहीये. जसं त्या जय शाहला बसवलं तुम्ही तिकडे", असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना प्रत्युत्तर दिलं. 

  • 01:50 PM • 22 Feb 2024
    फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकेन; रवींद्र धंगेकरांचा दावा

    पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार कोण असतील, यांची चर्चा सुरू आहे. या चर्चेला आता रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या विधानामुळे हवा मिळाली आहे. 

    माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, "आता लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे आणि पुन्हा एकदा माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. जर मला काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास नक्कीच लढेल आणि जिंकेल देखील."

    "पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. पण या सर्व चर्चेवर एकच सांगू इच्छितो, आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या पाठीशी राहतील. त्यामुळे पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी लढवावी किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक लढवावी, ही निवडणूक मीच जिंकणार", असं सांगत धंगेकरांनी फडणवीस आणि भाजपला चॅलेंज दिलं. 

  • 01:25 PM • 22 Feb 2024
    आदित्य ठाकरे-रश्मी ठाकरे मोदींच्या मतदारसंघात

    उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. मायलेक हे देवदर्शनासाठी जात असून, आज वाराणसीच्या मंदिरात पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ही  वाराणसी दौऱ्यावर आहेत.

  • 01:22 PM • 22 Feb 2024
    आदित्य ठाकरे-रश्मी ठाकरे मोदींच्या मतदारसंघात

    उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. मायलेक हे देवदर्शनासाठी जात असून, आज वाराणसीच्या मंदिरात पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ही  वाराणसी दौऱ्यावर आहेत.
    लोक सभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर ठाकरे माता-पुत्राचे देवदर्शन ?

  • 10:50 AM • 22 Feb 2024
    भाजपचं मुंबईवर लक्ष, १७ मान्यवरांच्या अर्धाकृती पुतळ्यांचं अनावरण

    भाजपने मुंबईतील लोकसभा मतदारसंघांवरही विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईच्या विकासात योगदान दिलेल्या मान्यवरांचे अर्धाकृती पुतळे तयार केले आहेत. त्यांचे अनावरण नड्डा यांच्या हस्ते केले गेले.

    1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
    2) स्वा. सावरकर 
    3) लता मंगेशकर 
    4) दादासाहेब फाळके 
    5) कुसुमाग्रज 
    6) होमी भाभा 
    7) जेआरडी टाटा 
    8) जगन्नाथ शंकर शेठ 
    9) अण्णाभाऊ साठे
    10) बाळासाहेब ठाकरे 
    11) धीरूभाई अंबानी 
    12) रामनाथ गोयंका 
    13) सेठ मोती शाह 
    14) हुतात्मा बाबू गेणू 
    15) अशोक कुमार जैन 
    16) कोळीबांधव 
    17) सचिन तेंडुलकर  

  • 10:45 AM • 22 Feb 2024
    उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघांचा करणार दौरा?

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहेत. कोकण, मराठवाड्यातील दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता विदर्भ दौऱ्यावर जात आहेत. 

    उद्धव ठाकरे आता बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. २२ फेब्रुवारी रोजी चिखली, मोताळा, जळगाव जामोद, तर 23 फेब्रुवारी रोजी खामगाव, मेहकर, सेनगाव, कळमनुरी येथे उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. 

follow whatsapp