लाइव्ह

Maharashtra Mumbai rain live : मध्य रेल्वेकडून मुंबईकरांना दिलासा! 'लोकल ट्रेन'बद्दल मोठी अपडेट

मुंबई तक

08 Jul 2024 (अपडेटेड: 08 Jul 2024, 05:57 PM)

IMD predicts rain in Mumbai : महाराष्ट्रभर मान्सून व्यापला असून, शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली असून, पुढील काही तासांत मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

मुंबई लोकल सेवा पूर्वपदावर. हार्बर लाईनवरवरील लोकल रेल्वेही सुरू.

मुंबई लोकल सेवा पूर्वपदावर. हार्बर लाईनवरवरील लोकल रेल्वेही सुरू.

follow google news

Maharashtra Mumbai Rain Live News : पहिल्याच पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली. मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून, पूर परिस्थिती ओढवली आहे. 

शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर ठाणे, पुणे जिल्ह्यातील काही भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्व भागात हवामान कसे असेल आणि कोणत्या भागात पावसाचा अंदाज काय? मुंबईतील लोकल रेल्वे सेवा, याबद्दलचे सर्व लाईव्ह अपडेट्स वाचा...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:53 PM • 08 Jul 2024
    Mumbai Local Trains Latest Update : 'मुंबई लोकल'बद्दल मोठी अपडेट

    सकाळपासून पावसाने वेठीस धरलेली मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा अखेर पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेने याबद्दल माहिती दिली आहे. 

    मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली/कसारा अप आणि डाऊन मार्गावरील सेवा सुरळीत सुरू झाली आहे. 

    हार्बर लाईनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/गोरेगाव लोकल सेवा सुरू झाली आहे. त्याचबरोबर ट्रान्स हार्बर म्हणजेच ठाणे ते वाशी आणि पनवेल लोकल रेल्वे सेवाही सुरू झाली आहे. बेलापूर/नेरूळ ते खारकोपर मार्गावरील लोकल सेवाही सुरळीत झाली आहे. 

     

  • 02:25 PM • 08 Jul 2024
    ''मुंबईकरांनो गरज असेल तर घराबाहेर पडा'', CM शिंदेंचे आवाहन

    मुंबईला पावसाने पुर्णपणे झोपडलं आहे. त्यामुळे मुंबईची लोकलसेवा पुर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. मुंबईतील ही संपूर्ण परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरज असेल तर घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

    मुंबईतील या पुरस्थितिची आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या आढाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील पुरस्थितीची माहिती दिली. मुंबईत 267 मीमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुरस्थिती निर्माण झाली होती. रेल्वे ट्र्रॅकवर पाणी आल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. 

    रेल्वेचे 200 आणि पालिकेचे 481 पंप असल्याकारणाने पाण्याचा निचरा होत आहे. पाणी निचरा झाल्याने रेल्वे सेवा सुरळीत होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भरतीची पुन्हा सुचना देण्यात आली आहेय त्यामुळे मुंबईतील चौपाट्यांवर जाण्यास बंदी घातली आहे. आर्मी,नेवी आणि एअरफोर्स सगळ्यांना अलर्टवर ठेवले आहे. आपली यंत्रणा सुसज्ज आहे.  शाळांना सुट्टी दिली आहे आणि गरज असल्यास घराबाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईकरांना केले आहे. 

  • 01:14 PM • 08 Jul 2024
    Maharashtra Rains Live Updates : राज्यात पूरपरिस्थिती, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

    मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला.

    मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर,  मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ‌ आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी या बैठकीला उपस्थित होते. 

     

  • 12:57 PM • 08 Jul 2024
    Mumbai Rains : रेल्वे खोळंल्या, कॅबिनेट मंत्र्यानाही बसला फटका

    मुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका बसला आहे. पावसामुळे अनेक कर्मचारी अजून विधानभवनात पोहोचलेले नाहीत. कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. 

    पावसामुळे अनेक मंत्री, आमदार गावातून मुंबईत पोहोचलेले नाहीत. सकाळी ठाण्यापासून मुंबईच्या लोकल बंद होत्या. आता लोकल हळूहळू सुरू झाल्या आहेत. रेल्वे खोळबंल्या. मंत्री हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्‍स्प्रेसने कल्याणला आले. तेथे ट्रेन सकाळी थांबली. ते नंतर कारने मुंबईत आले.

     

  • 12:45 PM • 08 Jul 2024
    Maharashtra Rain Live Updates : सिंधुदुर्गला अतिवृष्टीचा इशारा, पुण्याला ऑरेंज अलर्ट

    हवामान विभागाने 8 जुलै रोजी पाऊस कसा असेल, याबद्दल अंदाज वर्तवला आहे. 

    कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासकीय आणि बचाव व मदत कार्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. 

    दुसरीकडे रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

    ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

     

  • 12:14 PM • 08 Jul 2024
    Mumbai Rains live : मुंबईतील शाळा, महाविद्यालयाना सुट्टी

    मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच दुपारी 1.57 वाजता समुद्रात 4.40 मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे.

     

follow whatsapp