Maharashtra Weather : पुणे, ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार कायम

मुंबई तक

• 05:53 PM • 28 Jul 2024

Mumbai Rain Updates : हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हवामानाचे ताजे अपडेट्स

महाराष्ट्रात हवामान कसे असेल?

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज २९ जुलै

point

मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात कसा असेल पाऊस?

point

मराठवाडा आणि विदर्भातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra Mumbai Rain Updates : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांना वेठीस धरणाऱ्या पावसाचा जोर काही ठिकाणी कमी होणार आहे. असे असले तरी पुढील दोन-तीन दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (IMD Weather forecast of Maharashtra)

हे वाचलं का?

28 जुलै रोजी अनेक भागात पावसाने उसंत घेतली. मात्र, रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे, रायगड, सातारा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. 

29 जुलै रोजी महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

सोमवारी म्हणजे 29 जुलै रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील अमरावती आणि ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे वगळता इतरत्र हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >> 15 वर्षाची असताना अत्याचार; यशश्रीचा हालहाल करून घेतला जीव! 

नंदूरबार, नाशिक, पालघर, मुंबई या जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 

महाराष्ट्रात 30 जुलै रोजी कसे असेल हवामान?

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्येही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

हेही वाचा >> मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली नावं, पण गर्लफ्रेंडनेच काढला काटा, Inside Story

महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस हवामान कसे असेल?

नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूरसह इतर जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. 
 

    follow whatsapp