Today Weather Updates मुंबई : हवामान बदलातील परिणामांमुळे राज्यातील विविध ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसानंतर आता आज आकाश निरभ्र असणार आहे. राज्यात आता थंडी परतली असून, कमाल आणि किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. राज्यभर रात्री आणि पहाटेच्यावेळी हवेत मोठ्याप्रमाणात गारवा जाणवत असून, त्यामुळे सगळीकडेच आता शेकोट्या पेट्ल्या आहेत. त्यातच येणाऱ्या आठवडाभरात तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. धुळे कृषी महाविद्यालयात 9.5 अंश एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असून, सर्वात जास्त तापमान नांदेड आणि सोलापुरातील जेऊरमध्ये आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Viral News: 16 लाखांची 'ही' सर्जरी करून मॉडेल होणार पुन्हा VIRGIN! आहे तरी कोण?
पुढच्या 10 दिवसांमध्ये राज्यात काही भागात थंडी काहीशी वाढणार तर काही भागात अशीच थंडी कायम टिकून राहणार आहे. त्यामध्ये नाशिक आणि एकूणच खान्देशच्या काही भागात थंडीचा जोर वाढताना दिसणार आहे. तर खान्देश आणि मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 10 डिसेंबरनंतर विदर्भात थंडी वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.
कोणत्या जिल्ह्यात तापमान किती?
छत्रपती संभाजीनगर : 15°
कोल्हापूर : 29°
महाबळेश्वर : 25.4°
मुंबई : 22°
पुणे : 13°
परभणी : 27.8°
मालेगाव, नाशिक : 20°
अहमदनगर : 18.8°
जेऊर, सोलापूर : 31°
नांदेड : 30°
हे ही वाचा >>शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 11 आमदार होणार मंत्री, दोन दिग्गजांना डच्चू?
महाराष्ट्रावर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळेच अलीकडच्या काही दिवसात गारठा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात चांगलीच घट झाली असून, गारठाही कमालीचा वाढला आहे. मुंबई आणि कोकण वगळता राज्यातील इतर भागात येणाऱ्या आठवडाभरात थंडी वाढण्याची जास्त शक्यता आहे.
ADVERTISEMENT