Maratha Reservation : उठता, बसता येईना...कंठ दाटला, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली!

मुंबई तक

12 Feb 2024 (अपडेटेड: 12 Feb 2024, 12:26 PM)

Manoj Jarange Patil, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली आहे. जरांगेंना उठता येत नाही, बसता येत नाही, तसेच त्याचा आवाजही बिघडल्याची माहिती आहे.

Manoj Jarange Patil, Maratha Reservation :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली आहे. जरांगेंना उठता येत नाही, बसता येत नाही, तसेच त्याचा आवाजही बिघडल्याची माहिती आहे.

manoj jarange health deteriorated third day of fasting maratha reservaton cm eknath shinde

follow google news

Manoj Jarange Patil, Maratha Reservation : इसरार चिश्ती, संभाजीनगर  : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली आहे. जरांगेंना उठता येत नाही, बसता येत नाही, तसेच त्याचा आवाजही बिघडल्याची माहिती आहे. रविवारपासून त्यांनी प्रकृती बिघडली आहे, मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आज ही जरांगेंची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान  यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंनी पीएडीच्या विद्यार्थ्यांवरही संताप व्यक्त केला.  (manoj jarange health deteriorated third day of fasting maratha reservaton cm eknath shinde) 

हे वाचलं का?

 सारथीच्या विद्यार्थ्यांवर संतापले
 
अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसोबत उपोषण करणाऱ्या सारथीच्या विद्यार्थ्यांना जरांगे पाटलांनी चांगलचं झापलंय. मागच्या अठरा महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यानं सारथीचे विद्यार्थी आमरण उपोषणाला बसलेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना विद्यार्थी फक्त पीएचडी पुरतच बोलतात. त्यामुळं जरांगे पाटील चांगलेच संतापले असून हे उपोषण पीएचडीसाठी नाही तर मराठा आरक्षणासाठी आहे. तुम्ही तुमचंच बोलत आहात. आरक्षणाचा कुणी विषयच मांडत नाहीत. तुम्ही पीएचडी केली म्हणून हुशार समजता का. अशी नियत असल्यावर जातीचं केव्हा चांगलं व्हायचं असं म्हणत जरांगे पाटलांनी सारथीच्या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना झापलंय.

हे ही वाचा: Pankaja Munde: 'माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला, माझा वनवास...', पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

सग्या सोयऱ्याच्या कायद्याची सरकारने अधिवेशनात चर्चा करावी, वेगळ्या आरक्षणाची चर्चा करू नये. आणि ओबीसीतून आरक्षण दिलं तरच उपोषण मागे घेऊ. अन्यथा मी उपोषण मागे घेईन हे सरकारने विसराव असा इशारा देखील जरांगेंनी सरकारला दिला आहे. 15 तारखेच्या अधिवेशनात सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही आणि हैद्राबाद गॅझेट स्वीकारलं नाही तर महाराष्ट्रात काय होतं हे यांना कळेल असे देखील जरांगे म्हणाले. 

तसेच अमित शहांना गरज वाटली तर अंतरवालीत येतील,आमचं कुणीही त्यांना भेटायला जाणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.14 तारखेच्या महाराष्ट्र बंदबाबत मला माहिती नाही,तो समाजाचा निर्णय असेल तर समाजापेक्षा कुणीही मोठा नाही फक्त शांततेत आंदोलन करावं अशी अपेक्षाही जरांगे यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा: Eknath Shinde : 'उद्धव ठाकरेंना हाजमोला पाठवावा लागेल'; शिंदेंचा टोमणा

 

    follow whatsapp