Maratha Reservation Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या साधारण दोन महिन्यापासून रान उठवणारे मनोज जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) प्रकृती खालावली आहे. सोमवारी धाराशीवमधील सभेत बोलत असताना जरांगे पाटील अचानक खाली बसले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्यांना अंबाजोगाईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रातीला सल्ला दिला आहे. मात्र प्रकृती ठिक नसली तरी आजच्या नियोजित कार्यक्रमाला जाणार, असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केले आहे. (manoj jarange patil health update he will attend beed rally winter session live maratha reservation)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील रूग्णालयातून आज माध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे पाटलांच्या संवाद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी बीड जिल्ह्यात तीन सभा होणार आहेत. त्यात सोमवारी जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याने आजच्या बीडमधल्या नियोजित सभा होणार की नाही? असा प्रश्न मराठा समाजाला पडला होता. अखेर यावर मनोज जरांगे पाटील आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे.
हे ही वाचा : Deepak Kesarkar : “मविआ सोडणार, भाजपसोबत सरकार… उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं होतं वचन”
मी जरी आजारी असलो तरी मराठा समाजाच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे. माझ्या गोरगरीब लेकरांनी खुप वेदना सहन केल्या. एका एका टक्यामुळे हुकलेली पोर आहेत ही, चांगल्या चांगल्या पोस्ट गेल्या आणि खालच्या पोस्टवर समाधान मानावे लागले आहे,त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे आहे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज हिवाळी अधिवेशनात देखील चर्चा होणार आहे. यावर जरांगे म्हणाले की, खरंतर त्यांनी 8 तारीख दिलेली, त्या दिवशी संपूर्ण दिवस आरक्षणावर चर्चा होणार होती. मात्र एका नेत्याच्या दबावाखाली सरकार येतेय की काय? असा सवाल करत, आरक्षण देण्याबाबतही तेच घडते आहे, अटक करण्याच्या बाबतीतही सरकारचे तेच धोरण आहे. विनाकारण सरकार अन्याय करायला लागलंय हे आम्हाला दिसतेय, पण सरकारने लक्षात ठेवावं पुर्वीचा मराठा राहिला नाही, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी सरकारला दिला.
हे ही वाचा : ‘हात-पाय तोडून गोळ्या घाला’, माजी आमदाराच्या गुंडागर्दीचा व्हिडीओ व्हायरल
मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरला सरकारला अल्टीमेटम दिले आहे. या अल्टीमेटम आधी जरांगे पाटलांनी 17 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून या बैठकीला सुरूवात होणार आहे. या बैठकीसाठी समन्वय, साहित्यिक, डॉक्टर यासह इतर घटकांना निमंत्रण देण्यात येणार आहे.
प्रकृतीबाबत डॉक्टर काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटलांना सोमवारी चक्कर आणि ताप आला होता. त्यानंतर रूग्णालयात तापसणी केली असता जरांगेचे ब्लड प्रेशर कमी आहे, त्यांची शुगर कमी झाले होते. तसेच त्यांचे आहाराकडे दुर्लक्ष होतेय. आता सुद्धा मनोज जरांगेची तब्येत खालावली आहे. काळजी करण्यासारखीच आहे. औषध उपचार सुरु आहेत. पण त्यांचे ब्लड रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यांना नेमका कुठला आजार आहे, याबाबत स्पष्ट सांगता येणार आहे. तसेच सभेला जाण्यासारखी त्यांची प्रकृती अजिबात नसल्याचे देखील डॉ. संदीप थोरात यांनी सांगितले आहे.
भुजबळांवर टीका
त्यांचं (भुजबळांच) उभं आयुष्य मराठ्यांची लेकरं आयुष्य बरबाद करण्यात गेलं त्याने स्वतःच कुटुंब बरबाद केलं, आता धनगर समाजाला बरबाद करायला लागला.धनगर वंजारी समाजाच्या आरक्षणाला आमच्यापासून धोका नाही. एकनाथ शिंदे 100 टक्के आरक्षण देऊ शकतात दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांना साथ द्यायला हवी, असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान प्रकृती ठिक नसल्याचे डॉक्टरांनी सांगून देखील जरांगे पाटलांनी सभांना जाण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता सभास्थळी दाखल होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT