Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal : तुम्हाला गोळी मारतील, असे मला सांगण्यात आले, या छगन भुजबळ यांच्या विधानाने खळबळ उडाली. भुजबळांनी विधानसभेत बोलताना केलेल्या या विधानावर मनोज जरांगे पाटलांनी मोठं विधान केले आहे.
ADVERTISEMENT
विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणालेले की, “मला धकम्यांचे संदेश येत आहेत. मी त्याचा कार्यक्रम करतो. एक दिवस अचानक पोलीस बंदोबस्त वाढला. मी विचारलं तर सांगण्यात आलं की, तुम्हाला गोळी मारतील. हरकत नाही. मरायला तयार आहे.”
मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांबद्दल काय सांगितलं
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. “आम्ही त्यांच्यासारखं मरायला भीत नाही. त्याला संरक्षण पाहिजे. त्याला खोटं बोलून केसेस मागे घ्यायच्या आहेत. त्याला अडचणीतून बाजूला निघायचं आहे. देवेंद्र फडणवीसांचा वापर करायचा आहे. अजित पवारांना संपवून टाकायचं, असा त्याचा हळूहळू डाव असू शकतो”, असे मोठे विधान मनोज जरांगे पाटलांनी केला.
हेही वाचा >> “…ते मराठा आरक्षण टिकणार नाही”, जरांगेंचं मोठं विधान
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “त्याने सगळ्यांना तुडवलेलं आहे. तो लय विचित्र माणूस आहे. तो संरक्षण लावून घेईन. आम्हाला काही हरकत नाही. तुला काय लावायचं ते लाव. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, एवढं मात्र पाळ. त्याला काही काम राहिलेलं नाही.”
नितेश राणेंच्या इशाऱ्याला जरांगेंचं उत्तर
‘भाजप आमदार नितेश राणे असं म्हणालेले की, देवेंद्र फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांशी आहे’, यावरून मनोज जरांगेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, “हा. बघू बघू. त्यांच्यावर काही बोलायचं नाही. त्यांचं सगळ्या मराठ्यांना कळून चुकलेले आहे.”
हेही वाचा >> “कटोरा हात मैं लेकर, बाबा के नाम दे”, वडेट्टीवार भुजबळांवर कडाडले
“मराठ्यांशी गाठ आहे, तर ते वेळेवर कळेल. त्यांना सोडलंय वाटतं. त्यांची मजबुरी आहे. पक्ष त्यांना बोलायला लावतोय. फडणवीस त्यांना बोलायला लावतात. त्यामुळे त्यांची मजबुरी आहे. हे मराठ्यांचं वाटोळ करायला उठलेत हे मराठ्यांना कळलेलं आहे. ते पक्षच मोठा असं म्हणायला लागले आहेत”, असे उत्तर मनोज जरांगे पाटलांनी दिले.
ADVERTISEMENT