Manoj Soni : पूजा खेडकर प्रकरणावरून घमासान सुरू असतानाच UPSC अध्यक्षांचा राजीनामा

मुंबई तक

20 Jul 2024 (अपडेटेड: 20 Jul 2024, 10:53 AM)

UPSC Chairman, Manoj Soni News : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे अनेक प्रकरणांची चर्चा सुरू झाली असून, युपीएससीच्या निवड प्रक्रियेवर शंका व्यक्त केल्या जात आहेत. अशातच युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 

युपीएससी आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिला.

केंद्रीय लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा का दिला?

follow google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय लोक सेवा आयोगाचे अध्यक्षांचा राजीनामा

point

मनोज सोनी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला?

point

सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच घेतला निर्णय

Manoj Soni UPSC News : आयएएस पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे युपीएससी अर्थात केंद्रीय लोक सेवा आयोगाची प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी यांनी हा निर्णय घेतला आहे. (Manoj Soni, Chairman of UPSC has resigned before tenure end)

हे वाचलं का?

केंद्रीय लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता.

हेही वाचा >> वाघनखं खरी की खोटी.. सरकार आणि इतिहास संशोधकाचा दावा काय? 

मनोज सोनी यांनी 2017 पासून युपीएससीचे सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर 16 मे 2023 मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. युपीएससी अध्यक्षांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. त्यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

मनोज सोनी यांनी का दिला राजीनामा?

पूजा खेडकर यांच्या निवडीचे प्रकरण देशभर गाजत आहेत. त्याचबरोबर इतर अनेक प्रकरणांचीही चर्चा सुरू झाली आहे. अशात सोनी यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे सोनी यांनी पत्रात म्हटले आहे.

मोदींच्या जवळचे मानले जातात मनोज सोनी

मनोज सोनी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. २००५ मध्ये वडोदरातील एमएस विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. युपीएससीमध्ये काम करण्यापूर्वी सोनी हे तीन  वेळा कुलगुरू राहिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबडेकर मुक्त विद्यापीठाचे दोन वेळा ते कुलगुरू होते.

हेही वाचा >> 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा, फीबाबत सरकारचा मोठा निर्णय 

पूजा खेडकर प्रकरणामुळे युपीएससी चर्चेत

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेले आरोप, त्यानंतर त्यांनी युपीएससीची फसवणूक केल्याचे समोर आल्यापासून केंद्रीय लोक सेवा आयोग चर्चेत आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून युपीएससी पास केल्याच्या अनेक प्रकरणांना आता तोंड फुटले आहे.  
 

    follow whatsapp