Maratha Reservation : एक वाक्य लिहिलं अन् दिला जीव; तरुणाचा मृतदेह बघून…

भागवत हिरेकर

• 09:38 AM • 26 Oct 2023

Maharashtra Latest News : मराठा आरक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांना तरुणाजवळ सुसाईड नोट सापडली आहे.

youth Committed Suicide in kalamnuri of Hingoli for Maratha Reservation

youth Committed Suicide in kalamnuri of Hingoli for Maratha Reservation

follow google news

Maratha reservation, youth committed suicide in Hingoli : मराठा आरक्षण मुद्द्याने महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे पाटलांनी या मागणीसाठी उपोषण सुरू केल्यापासून मराठा समुदाय पुन्हा एकटवला आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात एका तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तरुणाचा मृतदेह ज्या अवस्थेत होता, ते बघून घटनास्थळी जमलेल्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे वाचलं का?

मराठा आरक्षण : आत्महत्या केलेला तरुण कोण?

कळमनुरी तालुक्यातील देवचना शिवारात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. कृष्णा कल्याणकर (वय 25, रा. देवजना) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी कन्हेगाव शिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला.

हे ही वाचा >> Manoj Jarange : सदावर्ते म्हणाले, ‘श्रद्धेय देवेंद्रजीं’; जरांगेंचा चढला पारा,”यांचे श्रद्धेय मराठा समाजाला…”

एका ओळीच्या चिठ्ठीत काय?

आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी मयत तरुणाजवळ “आपण मराठा आरक्षसाठी आत्महत्या करत आहे”, असा मजकूर लिहिलेली चिट्ठी मिळाली.

हे ही वाचा >> Manoj Jarange : ‘जरांगेला अटक करा, मुसक्या…’, सदावर्ते फडणवीसांचं नाव घेऊन काय बोलले?

तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलाचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे पो.उप निरीक्षक शिवाजी बोडले करत आहेत.

मनोज जरांगेंचे आवाहन तरीही आत्महत्यांचे सत्र सुरूच

राज्यात मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 15 ते 16 जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी या घटनांवर दुःख व्यक्त करतानाच मराठा समाजातील तरुणांनी आणि इतरांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केलेले आहे. मला तुमची गरज आहे. आत्महत्या करून नका, असे जरांगे पाटलांनी म्हटलेले आहे. मात्र, दुसरीकडे या घटनांची मालिका सुरूच आहे.

    follow whatsapp