Vegetable seller son CA: डोंबिवलीतील भाजीवाल्या मावशींचा मुलगा झाला CA, देवेंद्र फडणवीसांकडूनही कौतुक!

मिथिलेश गुप्ता

• 03:12 PM • 16 Jul 2024

Dombivli Vegetable seller son CA: डोंबिवलीमध्ये भाजी विक्री करून आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या आईला मुलाने देखील तेवढंच मोठं सरप्राईज दिलं आहे. थेट सीएची परीक्षा पास होत योगेश ठोंबरेने तरुणांना एक नवा आदर्श घालून दिला आहे.

डोंबिवलीतील भाजीवाल्या मावशींचा मुलगा झाला CA

डोंबिवलीतील भाजीवाल्या मावशींचा मुलगा झाला CA

follow google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीमधील तरुणांचं मोठं यश

point

सीएची परीक्षा पास होऊन डोंबिवलीतील तरुणाने आईचं स्वप्न केलं पूर्ण

point

भाजी विक्री करुन मुलाला बनवलं सीए

Vegetable seller son CA: डोंबिवली: डोंबिवलीमध्ये एका भाजी विक्रेता महिलेचा मुलगा सीए (CA) झाला. सीए झाल्यावर या मुलांने त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेशवर अभिनंदनचा वर्षाव होत असून ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. (minister ravindra chavan tribute to ca exam success of vegetable seller woman son dcm devendra fadnavis also praised yogesh thombre)

हे वाचलं का?

या घटनेचा व्हिडीओ हा सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा या संदर्भात व्हिडिओ ट्विट केला आहे आणि या व्हिडीओवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा>> UPSC निकाल जाहीर, पाहा संपूर्ण टॉपर्सची यादी

जिद्द, कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टीमुळे योगेशने सुद्धा आपल्या आईच्या कष्टाचं सार्थक केलं आहे. सोमवारी योगेश सीए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली आहे. हे सर्व दृश्य पाहून आजूबाजूच्या नागरिकांचे सुद्धा डोळे पाणावले.

योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील खोणी गावामध्ये राहतो. योगेशची आई निरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात. गेल्या 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकत आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. त्यावेळेला दोनशे रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांच्या याच कष्टाचं चीज आज योगेशने केलं आहे.

हे ही वाचा>> संभाजीनगरची तनिशा राज्यात अव्वल, बारावीत मिळवले 100 पैकी 100 मार्क

योगेश सीएची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर निरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्यानं घर, संसार सांभाळत हा व्यवसाय केला. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही.

आईने भाजी विकून कष्ट उपसले, पोराने सीए बनूनच दाखवलं!

'सीए बनायचं असं मनात ठरलं होतं. त्यानुसार नियोजन करूनअभ्यास केला. मी रिझल्टची वाट बघत होतो.. मात्र रिझल्ट समोर आला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ही गोड बातमी घेऊन मी आईला सांगायला गेलो तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत होती. मी आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाइलमध्ये कैद केला.'

'हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे याची कल्पना मला नव्हती. मात्र फोन सुरू झाले. अनेक मोठ्या नेत्यांनी ट्विट केलं. त्यानंतर मला समजलं.' अशा भावना योगेशने व्यक्त केल्या आहेत. 

मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता आज सीए झाला. योगेशने आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून अनेक जुने ग्राहक सुद्धा त्यांच्या मैत्रिणी ओळखीतले त्यांना शोधत आज त्यांच्या भाजीच्या दुकानात येऊन त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत.
 

    follow whatsapp