RK Ranjan Singh House : मणिपूरमधील हिंसाचार अजूनही नियंत्रणात आलेला नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच गुरुवारी (15 जून) रात्री जमावाने पुन्हा एकदा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. जमावाने राजकुमार रंजन सिंह यांचे घरच पेटवून दिले. या अग्निकल्लोळात घर पूर्णपणे जळून खाक झाले. केंद्रीय मंत्र्याचे हे निवासस्थान इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कोंगबा नंदीबाम लेकाई भागात आहे. एक दिवस आधी मणिपूर सरकारमधील मंत्री नेमचा किपगेन यांच्या घराला इंफाळमध्ये आग लावण्यात आली होती. (union minister rk ranjan singh house torched by mob)
ADVERTISEMENT
परराष्ट्र मंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी सांगितले की, “मी सध्या प्रशासकीय कामासाठी केरळमध्ये आहे. सुदैवाने काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब आणले होते. माझ्या घराचा तळमजला आणि पहिला मजल्याचे नुकसान झालेले आहे. माझ्या राज्यात जे घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटत आहे. मी शांततेचे आवाहन करत राहीन. या प्रकारच्या हिंसाचारात सामील असलेले लोक पूर्णपणे माणुसकी नसलेले आहेत.”
हेही वाचा >> मोदी-शाहांचा आता यांच्यावर ‘डोळा’! काय आहे स्ट्रॅटजी?
गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक जमाव आला आणि मंत्री रंजन सिंह यांच्या घरात घुसला. जमावाने घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. जमाव इतका आक्रमक होता की, गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही गर्दी रोखता आली नाही. घटनेच्या वेळी रंजन सिंह किंवा त्यांचे कुटुंबातील कुणीही घरात नव्हते. जमावाने घरावर हल्ला केला आणि नंतर पेट्रोल बॉम्बने घर पेटवून दिले.
घरावर चारही बाजूंनी केला हल्ला
घटनेच्या वेळी मंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा एस्कॉर्ट कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि अतिरिक्त रक्षक ड्युटीवर होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने सांगितले की, ‘हल्ल्यादरम्यान जमावाकडून चारही बाजूंनी पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. गर्दी प्रचंड होती, त्यामुळे जमावाला रोखणे अशक्य झाले होते.’ 3 मे पासून सुरू असलेल्या संघर्षात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा >> ‘बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद ‘, शिंदे-फडणवीसांतील सुप्त संघर्षावर शिवसेनेचे (UBT) स्फोटक भाष्य
आधीही जमावाने केला होता हल्ला
यापूर्वी 25 मे रोजी जमावाने केंद्रीय मंत्र्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. इम्फाळ पूर्वेतील कोंगपा नंदेई लीकाई येथे मोठा जनसमुदाय जमला होता. सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. इम्फाळ पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी पूर्णवेळ कर्फ्यू लागू करण्यात आला होता. 4 दिवसांनी म्हणजे 29 मे रोजी जमावाने तोडफोड केली. बिष्णुपूर आणि टेंगोपालमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
हेही वाचा >> मनोज सानेला होती सेक्सची चटक, म्हणून सरस्वतीला… फोनमध्ये सापडले पॉर्न Video
इंफाळमध्ये मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान जाळले
बुधवारी संध्याकाळी मणिपूरचे मंत्री नेमचा किपजेन यांचे इंफाळ पश्चिम येथील सरकारी निवासस्थान समाजकंटकांनी पेटवून दिले होते. येथे खामेनलोक गावात समाजकंटकांच्या गटाने अनेक घरे जाळली. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंग येथे अनेक जण जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा कर्मचारी अतिसंवेदनशील भागात गस्त घालत आहेत.
मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू आहे संघर्ष
मणिपूरमध्ये मैती समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीला विरोध केला जात आहे. 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मार्च काढल्यानंतर येथे संघर्ष सुरू झाला. गेल्या महिन्यात, आरके रंजन सिंग यांनी हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील राज्यात शांतता कशी आणता येईल यावर चर्चा करण्यासाठी मणिपूरच्या मेईतेई आणि कुकी समुदायातील लोकांच्या गटाची बैठक घेतली होती.
ADVERTISEMENT