Mohammed Siraj RCB vs GT IPl 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लिलावात बाहेरचा रस्ता दाखवलेल्या मोहम्मद सिराजने 2 एप्रिलला झालेल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. गुजरात टायटन्स संघाकडून खेळणाऱ्या सिराजने आरसीबीविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सिराजने एकप्रकारे आरसीबीचा बदलाच घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. कारण गुजरात संघाकडून खेळताना सिराजने आरसीबीच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. परंतु, आरसीबी समोर मैदानात उतरलेला सिराज काहीसा भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे गुजरात टायटन्ससाठी 3 विकेट्स घेणारा सिराज या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ठरला.
ADVERTISEMENT
यापूर्वी आरसीबी संघासाठी खेळणारा मोहम्मद सिराज यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबी संघाविरुद्ध मैदानात उतरला. आरसीबी विरुद्ध सामना जिंकल्यानंतर मोहम्मद सिराज भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. सिराज आरसीबी विरुद्ध पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि भेदक गोलंदाजी करून आरसीबीच्या खेळाडूंच्या भुवयाच उंचावल्या. कारण सिराजच्या अप्रतिम गोलंदाजीमुळेच गुजरात टायटन्सला विजयाला गवसणी घालता आली.
हे ही वाचा >> Crime : उज्ज्वल-नीलूचा पर्दाफाश! मॉडेलसोबत कसं करायचे 3-4 तास पॉर्न शूटिंग? शेजाऱ्यांनी सगळंच सांगितलं
सिराजने त्याच्या बॉलिंग स्पेलमध्ये पहिल्यांदा देवदत्त पडिक्कल (4), फिल सॉल्ट (14) धावांवर बाद करून आरसीबीला जोरदार धक्का दिला. यामुळे आरसीबीच्या धावसंख्येला ब्रेक लागला. त्यानंतर सिराजने आरसीबीचा हायएस्ट स्कोरर लियाम लिविंगस्टोनला (54) धावांवर तंबुत पाठवला. त्यामुळे सिराजने गोलंदाजीत 4-0-19-3 अशी जबरदस्त कामगिरी केली. सिराजच्या या भेदक गोलंदाजीमुळेच आरसीबीचा संघ 169/8 धावाच करू शकला.
हे ही वाचा >> Viral Video : बायकोशी केलं भांडण! नवऱ्याने थेट समुद्रातच थांबवली बोट, पुढे जे घडलं...
धावांचा पाठलाग करताना गुजरात संघाकडून साई सुदर्शन (49), जोस बटलर (नाबाद 73), शेरफेन रदरफोर्डने (नाबाद 30) धावा केल्या. या धावांच्या जोरावर गुजरात संघाने आरसीबी विरुद्ध विजयी झेंडा फडकवला. सामन्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सिराज म्हणाला, मी थोडा भावनिक झालो होतो. सात वर्षानंतर मी माझी जर्सी रेडवरून ब्लू केली आहे. पण जेव्हा चेंडू हातात आला तेव्हा मी ठीक होतो.
ADVERTISEMENT
