MPSC Hall Ticket : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या गट क आणि गट ब च्या सयुक्त परीक्षेपुर्वी हजारो विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच या घटनेत 90 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डाटा डाटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.या गोंधळानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर परीपत्रक जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.(mpsc clarification on viral hall ticket in social media issue)
ADVERTISEMENT
टेलिग्राम (Telegram) या सोशल मीडियावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल झाले होते. यासंबंधीत अनेक स्क्रिनशॉट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.या स्क्रिनशॉटमध्ये विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या महत्वाच्या कागदपत्रांपासून पुर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच अनेक व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण हॉल तिकीटची फाईल उघडून दाखवण्यात आली होती. ऐन परिक्षेच्या तोंडावर ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.या घटनेची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली असून, हॉल तिकीट टेलिग्रामपर्यंत पोहोचली कशी याची चौकशी केली जात आहे.
MPSC च्या ट्विटमध्ये काय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 एप्रिल 2023 रोजी नियोजित विषयांकित परिक्षेची हॉलतिकीट 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाच्या वेबसाईटवर आणि तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली हॉलतिकीट एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध झाल्याची बाब निदर्शनास आली होती.या घटनेनंतर बाह्यलिंकद्वारे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची हॉलतिकीट वगळता कोणताही इतर डेटा लिक झालेला नसल्याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच या टेलिग्राम लिंकवर विद्यार्थ्यांचा वैयक्तिक डेटा किंवा प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धांदात खोटा असून प्रश्नपत्रिका लिक झाली नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान या घटनेनंतर आयोगाने पुर्वनियोजित वेळेनुसार परीक्षा होणार असल्याचे सांगितले आहे.त्याचबरोबर
ऑनलाईन डाऊनलोड केलेल्या हॉलतिकीटच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे,असे देखील त्यांनी सांगितले आहे.तसेच या प्रकरणात टेलिग्रामवर हॉ़ल तिकीट लिंक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरूद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT