Mumbai Local Train Update : मध्य आणि हार्बर लाईनवर कुठपर्यंत धावणार 'लोकल'?

भागवत हिरेकर

31 May 2024 (अपडेटेड: 31 May 2024, 12:54 PM)

Mumbai local train news : मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक घेतल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. कल्याण, कर्जत, कसाराकडून येणाऱ्या रेल्वे कुठपर्यंत धावणार?

सीएसएमटी ते वडाळा रोडी आणि सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकल सेवा राहणार बंद.

कोणत्या मार्गावर मुंबई लोकल सेवा बंद राहणार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई लोकल रेल्वे सेवा अपडेट्स

point

सीएसएमटी ते दादर आणि सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद

point

लोकल रेल्वे सेवेमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल

63-hour mega block in Mumbai from May 30 Latest News : मध्य रेल्वेने महत्त्वाची कामे करण्यासाठी घेतलेल्या मेगा ब्लॉकने नोकरदारांसह मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. शुक्रवारी (३० मे) मध्यरात्री १२.३० bवाजेपासून सुरू झालेला मेगा ब्लॉक २ जून रोजी दुपारी १२.३० पर्यंत चालणार आहे. त्यामुळे लोकल रेल्वे गाड्या कुठंपर्यंत धावणार याबद्दलही संभ्रम आहे. तेच जाणून घ्या. (mumbai local train Latest news in marathi)

हे वाचलं का?

सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणासाठी (CSMT Platform 10 and 11) मध्य रेल्वेने 36 तांसाचा ब्लॉक घेतला आहे. शुक्रवारी (३० मे) मध्यरात्रीपासून हा मेगा ब्लॉक सुरू झाला आहे.

हेही >> "निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार कुठे आहेत, हे शोधावं लागेल" 

त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीवरून कल्याण, कर्जत, कसारापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड हाल होत आहेत. त्याबरोबर हार्बर मार्गावर पनवेलकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रवाशांचीही हेळसांड होत आहे. 

Mumbai Local Train Mega Block : कुठून कुठपर्यंत धावणार लोकल?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फलाटाच्या विस्तारीकरणासाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉगमुळे सीएसएमटीपर्यंत लोकल धावणार नाहीत. मेगा ब्लॉक काळात हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा रोड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे.

हेही >> महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका, MVA ला किती जागा येणार? 

त्याचबरोबर सीएसएमटी स्थानक ते दादर-परळपर्यंत लोकल सेवा बंद असणार आहे. कल्याण, कर्जत, कसारावरून येणाऱ्या लोकल दादर किंवा परळपर्यंतच धावणार आहेत. तर डाऊन मार्गावरही परळ आणि दादर स्थानकातून लोकल सुटणार आहेत. त्यामुळे दादर, परळच्या पुढे कार्यालये असणाऱ्या नोकरदारांसह इतर कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत. 

अनेक लोकल फेऱ्या रद्द

ठाणे स्थानकातही फलाटाच्या रुंदीकरणासाठी मेगा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे.

 

दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे ठाणे येथील ब्लॉक काळात कर्जत, कसारा अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सीएसएमटीपर्यंत प्रवास करता येणार आहे. 
 

    follow whatsapp