मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर (Mumbai Pune Expressway) तेलाने भरलेल्या (oil tanker) टॅंकरला अपघात होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची भीषणता इतकी होती की, हायवेवर धुरांचे लोण पसरले होते. या घटनेत आता चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या जखमींना तत्काळ नजीकच्या पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एक्सप्रेस वेच्या लोणावळा हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशामन दलाला देण्यात आले असून,युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सूरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. त्यामुळे आता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहनांना दुसऱ्या मार्गावरून मार्गस्थ करण्यात आले आहे. (mumbai pune expressway oil tanker fire three killed two injured)
ADVERTISEMENT
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील (Mumbai Pune Expressway) लोणावळा हद्दीतील कुने गावाच्या ब्रीजवर आज पेट्रोलने भरलेल्या टॅंकरची रस्त्याच्या कठड्याला धडक बसली.या अपघातात टॅंकर पलटी होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीची भीषणता इतकी होती की, हायवेवर धुरांचे लोण पसरले होते. त्याचसोबत टॅंकरला लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण ब्रीज आणि त्या खालोखाल असलेला रस्ता देखील आगीची भक्ष्यस्थानी गेला होता. सुदैवाने या आगीत इतर कोणतेही वाहन भक्ष्यस्थानी आले नाही,त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. मात्र तरीही या भीषण अपघातात 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या सोबत दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी रूग्णांचा आता नजीकच्या पवना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दल आणि बचाव पथकाला देण्यात आली आहे. या माहितीनंतर अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच या घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे हायवेवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तसेच वाहतूकीचा खोळंबा होऊ नये यासाठी सध्या लोणावळा शहरातून वाहतूक वळवण्यात आली आहे.दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पेट्रोल वाहून नेणाऱ्या टॅंकरला अपघात झाला.या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पु्ण्याहून मुंबईला जाणाऱ्या या ट्रकची रस्त्याच्या कठड़्याला धडक बसली होती, या धडकेत ट्रक पलटी झाला आणि संपूर्ण पेट्रोल रस्त्यावर पडले होते. यामुळे आग लागून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई वाहतूक ठप्प झाली होती, अशी माहिती पुणे ग्रामीणचे डिवायएसपी कार्तिक साई यांनी दिली.
ADVERTISEMENT