Dahi handi 2023 : मुंबईतील निर्भया गोविंदा पथक ‘माँ काली’च्या वेशात फोडणार दहीहंडी, कारण काय?

रोहिणी ठोंबरे

06 Sep 2023 (अपडेटेड: 06 Sep 2023, 02:58 PM)

देशभरात कृष्ण जन्माष्टमीची तयारी अगदी धुमधडाक्यात जल्लोषात सुरू आहे. भारतातील प्रत्येक राज्यात कृष्ण जन्माष्टमी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते आणि यानिमित्ताने दहीहंडी देखील फोडली जाते.

Mumbaitak
follow google news

Nirbhaya Mahila Govinda Pathak : देशभरात कृष्ण जन्माष्टमीची तयारी अगदी धुमधडाक्यात जल्लोषात सुरू आहे. भारतातील प्रत्येक राज्यात कृष्ण जन्माष्टमी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते आणि यानिमित्ताने दहीहंडी देखील फोडली जाते. मुंबई आणि गुजरातमध्ये दहीहंडीचा देखावा खूप खास असतो. इथे गोविंदा थरांवर थर करत उंचच उंच थर करतात. तरूणांमधला हा जल्लोष पाहाण्यासारखा असतो. (Nirbhaya Mahila Govinda pathak of Mumbai will break Dahihandi in the avatar of Kali Mata)

हे वाचलं का?

यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबरला असून दहीहंडी उत्सव 7 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. जसा मुलांचा या सणाला मोठा सहभाग पाहायला मिळतो तसंच सध्याच्या काळात मुलीही काही कमी नाहीयेत हे दाखवून देतात. त्यांचीही दहीहंडी पथकं पाहायला मिळतात. असंच एक महिलांचं पथक आहे ज्याचं नाव ‘निर्भया महिला गोविंदा पथक’ आहे.

Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?

यावेळी कृष्ण जन्माष्टमी सणापूर्वी निर्भया महिला गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी जन्माष्टमीला त्या खास वेशभूषेत दहीहंडी फोडणार आहेत.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जनजागृती

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी महिला गोविंदा पथक काली मातेचं रूप धारण करणार आहेत. त्या दहीहंडी फोडण्याचा सरावही करत आहे. महिला गोविंदा पथकातल्या सुमारे 80 मुली या दहीहंडीत सहभागी होणार आहेत. या सर्व मुलींना मार्शल आर्टचे पूर्ण प्रशिक्षण दिले आहे. मुंबईत हजारो गोविंदा पथक आहेत.

Crime : भाजप नेत्याचा बापासमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार, घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले

काली मातेच्या रूपातील महिला गोविंदा!

पण, या सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे 10 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील महिला यात सहभागी होत आहेत. या महिला गोविंदा पथकाचा मुख्य उद्देश महिलांवर होणारे अत्याचार थांबवणे आहे. त्याचबरोबर काली मातेच्या रूपातील महिलाही गोविंदा, मातेचा तांडव करून, 5 गट तयार करून दहीहंडी फोडण्याचा सराव करत आहेत.

    follow whatsapp