Pune Accident : सुसाट कारने महिलेला उडवलं, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV समोर

मुंबई तक

13 Jun 2024 (अपडेटेड: 13 Jun 2024, 07:39 PM)

Pimpari Chinchwad Accident News : भोसरी परिसरातील स्वराज सोसायटीसमोर एक महिला रस्ता ओलांडत होती. या दरम्यान एका भरधाव कारने तिला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की महिला दुरवर फेकली गेली होती. त्यानंतर स्थानिकांनी तत्काळ महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

pimpari chinchwad accident news hit and run case driver hit women while crossing road shocking story

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

follow google news

Pimpari Chinchwad  Accident News : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनच्या (Hit And Run) केसेस थांबायचा नाव घेत नाहीयेत. आता पुन्हा एकदा अपघाताची भीषण घटना घडली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला एका भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कारचालक फरार झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.   (pimpari chinchwad accident news hit and run case driver hit women while crossing road shocking story) 

हे वाचलं का?

भोसरी परिसरातील स्वराज सोसायटीसमोर एक महिला रस्ता ओलांडत होती. या दरम्यान एका भरधाव कारने तिला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की महिला दुरवर फेकली गेली होती. त्यानंतर स्थानिकांनी तत्काळ महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तसेच या घटनेनंतर आरोपी कार चालक फरार झाला होता. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  

हे ही वाचा : "विधानसभेला 288 जागांवर उमेदवार पाडणार", जरांगेंचा महायुतीविरोधात एल्गार

मिळालेल्या माहितीनुसार, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाकडून ही अपघाताची घटना घडली होती.या प्रकरणी जीवराम तेजाराम चौधरी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.या तक्रारीनंतर पोलिसांनी  कलम 279, 337,338, मोटार वाहन कायदा 184,119/177 अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत कार चालक विनय विलास नाईकेरे (23) याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात रस्ते अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे नागरीकांमध्ये रस्त्यावर चालण्याची भीती निर्माण झाली आहे.

    follow whatsapp