Prakash Shendage Manoj Jarange Maratha Reservation : (कुंवरचंद मंडले, नांदेड) : मनोज जरांगे हे राज्यात आढळून आलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. मात्र, राज्यात आढळून आलेले 57 लाख कुणबी प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. (Prakash Shendge said 57 lakh kunbi caste certificate is bogus)
ADVERTISEMENT
ओबीसी बहुजन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे हे आज नांदेड दौऱ्यावर होते. प्रकाश शेंडगे यांनी आरक्षणावर बोलताना सांगितले की, "ओबीसी समाजाकडून वारंवार सांगितले जात आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला शिंदे समितीकडून कुणबी प्रमाणपत्र देणं चालू आहे, हे मुळीच मान्य नाही."
काय म्हणाले प्रकाश शेंडगे?
"सरकारनं एक दिवसाच अधिवेशन घेतले होते, त्यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे, त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो आणि त्या 10% आरक्षणाला आमचं समर्थन करतो. कुणबीकरण करून ओबीसीमध्ये घुसने चालू आहे, ते मान्य नाही. ते ताबडतोब थांबवला पाहिजे ही आमची भूमिका आहे", असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
हेही वाचा >> 'तू चूक केली', भांबेरीतून जरांगेंनी फडणवीसांना काय दिला इशारा?
"हा समाज ओबीसीमध्ये आला तर ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे. मराठा समाजाला विनंती आहे की, ओबीसीमधून आरक्षण मागू नये, नाहीतर पुढे चालून समाजा-समाजामध्ये दरी वाढत जाईल.चळवळीतल्या आंदोलकांना विनंती आहे त्यांनी आता ओबीसीचे आरक्षण हिरावून घेणारी आंदोलने थांबवावी", असेही ते म्हणाले.
57 लाख कुणबी प्रमाणपत्राबद्दल मोठं विधान
"कुणबी दाखले घेऊन मराठा समाजाचं नुकसान आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत माणसांचा आहे. कुणावरही टीका करत असताना भावना दुखावणार नाहीत, यांची काळजी घेतली पाहिजे. सरकारनं 57 लाख नोंदी ज्या आहेत त्या सर्व खाडाखोड करुन घेतलेल्या आहेत. ते आम्हाला मुळीच मान्य नाही. सर्व बोगस नोंदी आहे, हे कोर्टात टिकणार नाही. आम्ही कोर्टात कायदेशीर लढाई लढणार", असं आव्हानंही ओबीसी चे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली.
ADVERTISEMENT