Raksha Bandhan 2024 Muhurat and Timing: रक्षाबंधन नेमकं कधी, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता?

मुंबई तक

14 Aug 2024 (अपडेटेड: 14 Aug 2024, 06:05 PM)

Raksha bandhan 2024 in marathi: यावर्षी रक्षाबंधन सोमवारी, म्हणजे 19 ऑगस्ट रोजी आहे. पण, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे?

भद्राकाळात राखी का बांधत नाही?

रक्षाबंधन नेमके कोणत्या दिवशी आहे, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता?

follow google news

बातम्या हायलाइट

point

यंदा रक्षाबंधन कोणत्या दिवशी आहे?

point

राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे?

point

ज्योतिष रक्षाबंधनाच्या मुहूर्ताबद्दल काय बोलले?

Raksha bandhan 2024 date and time in Marathi: भावा-बहिणीमध्ये प्रेम वृद्धिंगत करणारा, भावा-बहिणीच्या नात्याला बळकट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन! श्रावण महिन्यात येणाऱ्या या सणाला बहीण भावाला राखी बांधते आणि बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो. दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावर्षी राखीपौर्णिम अर्थातच रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी आहे. (Raksha bandhan 2024 date and time and muhurt in Marathi)

हे वाचलं का?

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण येतो. यावेळी रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची सावली पडणार आहे. पुराणानुसार, असे म्हणतात की भद्राकाळात भावाला राखी बांधू नये. शूर्पणखेने रावणाला भद्राकाळात राखी बांधली होती आणि रावणाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे जाणून घेऊयात की, रक्षाबंधाच्या दिवशी आलेल्या भद्राकाळाबद्दल जोतिषी काय म्हणतात?

रक्षाबंधन शुभ मुहूर्त

ज्योतिषाचार्य पंडित वेदप्रकाश मिश्रा यांनी सांगितलं की, रक्षाबंधन यावर्षी सोमवारी, 19 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे. पण, श्रावण शुक्ल चतुर्दशी, 18 ऑगस्ट 2024 रोजी रात्री  2 वाजून 21 मिनिटांपासूनच भद्रा सुरू होणार आहे. 

Raksha Bandhan 2024 Muhurat : भावाला राखी कधी बांधायची?

भद्राकाळ श्रावण शुक्ल पौर्णिमा सोमवार, 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी संपणार आहे. त्यानंतर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त सुरू होईल. भद्रा काळ संपल्यानंतरच बहि‍णींनी भावाला राखी बांधावी, असे ज्योतिषी पंडित वेदप्रकाश मिश्रा यांनी सांगितलं.

हेही वाचा >> शरद पवारांवर जरांगेंचं टीकास्त्र, ''मराठा समाजाचं वाटोळ...'' 

भद्राचा परिणाम कधी होतो?

काशीतील कर्मकांड परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य अशोक द्विवेदी म्हणाले, "रक्षा बंधनाच्या दिवशी भद्रा काळ असेल. भद्राचे वास्तव्य पाताळ लोकांमध्ये असल्याने खूपच अशुभ मानले जात नाही. भद्रा जेव्हा पाताळ किंवा स्वर्गात असते, तेव्हा पृथ्वीवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. तरीही काही तास राखी बांधू नये. भद्रा काळ संपल्यानंतरच राखी बांधावी."

हेही वाचा >> सोन्याने खाल्ला खूपच भाव! 1 तोळ्याची किंमत ऐकूनच फुटेल घाम

रक्षाबंधनाला अनेक योग जुळून येणार

आचार्य दैवज्ञ कृष्ण शास्त्री रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोलताना म्हणाले की, "रक्षाबंधनाला अनेक योग जुळणार आहेत. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी सौभाग्य योग, रवि योग, शोभन योग संगमाबरोबरच सिद्धी योगही आहे. सोमवार असल्यामुळे हे योग खूप शुभ आहेत. रक्षाबंधनात भद्राकाळाचा अडथळा 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1.24 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर तुम्ही राखी बांधू शकता."

    follow whatsapp