Onion : ‘अजितदादांकडून माहिती घेतली असती, तर…’, शिंदेंवर रोहित पवारांचा पलटवार

भागवत हिरेकर

• 11:10 AM • 22 Aug 2023

onion price hike update : rohit pawar attacked on eknath shinde. he said don’t mislead to people over onion policy.

onion export duty hike : Rohit pawar hits out at eknath shinde.

onion export duty hike : Rohit pawar hits out at eknath shinde.

follow google news

Rohit Pawar Eknat Shinde : कांदा प्रश्नावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं. दुसरीकडे राज्य सरकारवरलाही लक्ष्य केले. शेतकरी आणि विरोधक आक्रमक होताच केंद्राने 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना डिवचलं. त्यानंतर रोहित पवारांनी उगाच पतंगबाजी करू नका, असं म्हणत पलटवार केलाय.

हे वाचलं का?

केंद्र सरकारने कांदा निर्यात कर 40 टक्के केला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. हा मुद्दा अडचणीचा तर असतानाच केंद्राने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 2,410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे शरद पवारांबद्दल काय म्हणाले?

केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, “केंद्राने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. २४१० रुपये प्रती क्विंटल अशा दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. हा दरही वाढून मिळावा तसेच २ लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त खरेदीची आवश्यकता भासल्यास ती देखील केंद्राने करावी अशी विनंती आपण केंद्राला केली आहे. साठवणूकीच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा आणि वाढ करण्याची मागणी राज्य शासनातर्फे नाफेडला करण्यात आली आहे.”

वाचा >> Amol Kolhe : ‘…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही’, कोल्हेंचा फडणवीसांना इशारा

हे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेही म्हणाले की, शरद पवार कृषिमंत्री असतानाही असा निर्णय झाला नव्हता. शिंदेंच्या या विधानावर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले की, “एकनाथ शिंदे साहेब, ‘पवार साहेब कृषीमंत्री असताना असा निर्णय झाला नाही’, असं आपण म्हणालात, पण अजितदादांसोबत पत्रकार परिषदेत आपण हे वक्तव्य करण्याआधी पवार साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले होते, याची माहिती अजितदादांकडून घ्यायला हवी होती. ती घेतली असती तर कदाचित आपण हे वक्तव्य केलंच नसतं.”

वाचा >> Tejas Thackeray : पश्चिम घाटात ठाकरेंनी शोधला नवा साप, नावाचा अर्थ आहे खास

“शरद पवारांनी असा निर्णय घेतला नाही, हे आपलं म्हणणं नक्कीच खरं आहे. कारण पवार साहेबांनी आजच्या भाजपा सरकार प्रमाणे निर्यात शुल्क आकारून कांद्याचे भाव पाडले नाहीत. प्रसंगी साहेब तत्कालीन वाणिज्य मंत्र्यांशी भांडले आणि शेतकरी हिताचेच निर्णय घेतले. त्यामुळं शिंदे साहेब आपण उगाचंच राजकीय पतंगबाजी न केलेचीच बरी”, असं उत्तर रोहित पवारांनी शिंदेंना दिलं.

    follow whatsapp