Rule Change: तुमच्या खिशाला बसणार फटका? 1 ऑगस्टपासून होणार 5 मोठे बदल!

मुंबई तक

29 Jul 2024 (अपडेटेड: 29 Jul 2024, 01:21 PM)

1st August New Rules : जुलै महिना संपायला आता फक्त दोन दिवस उरले आहेत आणि त्यानंतर 1 ऑगस्टपासून देशात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

1 ऑगस्टपासून कोणते 5 मोठे बदल होणार?

point

LPG गॅस सिलिंडरच्या किंमती

point

CNG-PNG चे दर

Rule Change 2024 India : जुलै महिना संपायला आता फक्त दोन दिवस उरले आहेत आणि त्यानंतर 1 ऑगस्टपासून देशात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांमधील बदलांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशावेळी यापैकी 5 मोठ्या बदलांबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊयात... (rule changes from 1st august 2024 lpg cylinder price to light bill and hdfc credit card know about it all in details)

हे वाचलं का?

1 ऑगस्टपासून कोणते 5 मोठे बदल होणार?

LPG गॅस सिलिंडरच्या किंमती

तेल विपणन (Oil Marketing) कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलतात. आता 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती जाहीर केल्या जाऊ शकतात. अलीकडच्या काळात 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत अनेक बदल दिसले असताना, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत जुलै महिन्याच्या 1 तारखेला कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती. अशा परिस्थितीत यंदाही घरगुती सिलिंडरच्या दरात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Anil Deshmukh : "...तर आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकलं असतं"

CNG-PNG चे दर

देशभरात महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत झालेल्या बदलाबरोबरच, तेल विपणन कंपन्या हवाई इंधनाच्या म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किंमतींमध्येही सुधारणा करतात. त्यांच्या नवीन किंमती 1 ऑगस्ट 2024 रोजी देखील जाहीर केल्या जाऊ शकतात. यापूर्वी एप्रिल महिन्यात एटीएफच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या.

HDFC बँक क्रेडिट कार्ड

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली HDFC बँक 1 ऑगस्टपासून क्रेडिट कार्ड यूजर्ससाठी बदल घडवून आणत आहे. CRED, Paytm, Mobikwik, Freecharge आणि इतर ॲप्सद्वारे HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरले असल्यास, त्या व्यवहारावर 1% शुल्क आकारला जाईल आणि प्रति व्यवहार मर्यादा 3,000 रुपये निश्चित केली आहे. 15,000 रुपयांपेक्षा कमी व्यवहारांसाठी इंधन व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, तसेच, 15,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर एकूण रकमेवर 1% शुल्क आकारला जाईल.

हेही वाचा: Maharashtra Weather Forecast : पुण्यासह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

गुगल मॅप चार्ज

गुगल मॅप 1 ऑगस्ट 2024 पासून भारतातही त्याचे नियम बदलणार आहे. जो संपूर्ण देशाला लागू होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने भारतात गुगल मॅप सेवेचे शुल्क 70 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय आता गुगल आपल्या मॅप सेवेचे पेमेंट डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये घेणार आहे.

हेही वाचा: Yashashree Shinde : केतकी चितळेचा यशश्रीच्या हत्येनंतर व्हिडीओ, पोलिसांवर गंभीर आरोप

ऑगस्ट महिन्यात 13 दिवस बँक हॉलिडे

ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, घर सोडण्यापूर्वी, प्रथम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेली बँक हॉलिडेची यादी पहा. ऑगस्टच्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, संपूर्ण महिन्यात 13 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. रक्षाबंधन, जन्माष्टमी, स्वातंत्र्यदिन अशा विविध सोहळ्यांमुळे बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी येणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.

    follow whatsapp