-जका खान, बुलढाणा
ADVERTISEMENT
Samruddhi Mahamarg Accident News : आधी जखमी झाले आणि नंतर आगीच्या लोळात होरपळून जीव सोडला. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 प्रवाशांच्या या मन सुन्न करणाऱ्या अपघाताने महाराष्ट्राचं ह्रदय पिळवटून गेलं. रविवारी (2 जुलै) 24 प्रवाशांच्या मृतदेहावर बुलढाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 24 चितांना अग्नी देताच स्मशानभूमी मृतांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने हादरून गेली. यावेळी उपस्थितांच्या काळजाचंही पाणी पाणी झालं.
समृद्धी महामार्गावर शनिवारी (1 जुलै) मध्यरात्री 1.32 वाजता टॅव्हल्स बसचा अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. अपघात आणि आग लागल्यानंतर उशिरापर्यंत मदत न मिळाल्याने 25 प्रवाशांचे जळून कोळसा झाला. त्यामुळे त्यांची ओळख पटवणेही मुश्किल झाले.
सामूहिक अंत्यसंस्काराचा घेतला निर्णय
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 25 प्रवाशी बसला लागलेल्या आगीत पूर्णपणे होरपळले. त्यामुळे त्यांची ओळख पटवणेही मुश्किल झाले होते. 11 जणांची ओळख पटली, मात्र इतरांची ओळख पटू शकली नाही. मृतदेह जळालेले असल्याने आणि त्यांना जास्त काळ ठेवणे अवघड असल्याने प्रशासनाने सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
Samruddhi Mahamarg Accident : ‘ना टायर फुटला, ना स्पीड जास्त’, असा झाला बस अपघात
त्यानंतर बुलढाणा येथील स्मशानभूमीत 24 मृतदेह आणण्यात आले आणि तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. एक मृतदेह मुस्लिम व्यक्तीचा असून, त्याची ओळख पटली आहे. त्यामुळे तो कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्या व्यक्तीचा दफनविधी केला जाणार आहे.
Samruddhi Mahamarg Accident : मृतांची नावे
1) कौस्तुभ काळे – नागपूर
2) कैलास गंगावणे – नागपूर
3) इंशात गुप्ता – नागपूर
4) गुडीया शेख – नागपूर
5) अवंती पोहनकर – वर्धा
6) संजीवनी गोटे – अल्लीपूर, वर्धा
7) प्रथमेश खोडे – वर्धा
8) श्रेया वंजारी – वर्धा
9) वृषाली वनकर – वर्धा
10) ओवी वनकर – वर्धा
11) शोभा वनकर – वर्धा
Buldhana Bus Accident होण्याआधीचा शेवटचा CCTV, ढाब्यावर काय घडलं?
समृद्धी महामार्गावरील जखमी झालेल्यांची नावे
1) शेख दानिश शेख इस्माईल – दारव्हा, यवतमाळ (वाहन चालक)
2) संदीप मारोती राठोड – तिवसा, अमरावती (क्लिनर)
3) योगेश रामराव गवई – छत्रपती संभाजीनगर
4) साईनाथ धरमसिंग पवार – माहूर, नांदेड
5) शशिकांत रामकृष्ण गजभिये – पांढरकवडा, यवतमाळ
6) पंकज रमेशचंद्र – हिमाचल प्रदेश
ADVERTISEMENT